नोकरी सोडल्यानंतरही पीएफ खात्यावर मिळते व्याज, जाणून घ्या सर्वकाही

EPFO | जर पहिल्या 36 महिन्यांत कोणतेही योगदान नसेल, तर कर्मचार्‍याचे पीएफ खाते निष्क्रिय खात्याच्या श्रेणीमध्ये ठेवले जाते. अशा परिस्थितीत, तुमचे खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला तीन वर्षांच्या आत काही रक्कम काढावी लागेल. जर कर्मचारी 55 व्या वर्षी निवृत्त झाला आणि 36 महिन्यांच्या आत ठेव काढण्यासाठी अर्ज केला नाही, तर पीएफ खाते निष्क्रिय होईल.

नोकरी सोडल्यानंतरही पीएफ खात्यावर मिळते व्याज, जाणून घ्या सर्वकाही
पीएफ
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 1:06 PM

नवी दिल्ली: एखादी नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होताना नोकरदारांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काही लोक निवृत्तीपूर्वी नोकरी सोडतात. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुम्ही काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. बरेच लोक नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हस्तांतरित करणे विसरतात. नोकरी सोडल्यानंतर तुमच्या पीएफ खात्याचे आणि त्यात जमा केलेल्या रकमेचे काय होते, याबद्दल अनेकांना नीटशी माहिती नसते.

जर पहिल्या 36 महिन्यांत कोणतेही योगदान नसेल, तर कर्मचार्‍याचे पीएफ खाते निष्क्रिय खात्याच्या श्रेणीमध्ये ठेवले जाते. अशा परिस्थितीत, तुमचे खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला तीन वर्षांच्या आत काही रक्कम काढावी लागेल. जर कर्मचारी 55 व्या वर्षी निवृत्त झाला आणि 36 महिन्यांच्या आत ठेव काढण्यासाठी अर्ज केला नाही, तर पीएफ खाते निष्क्रिय होईल. सोप्या शब्दात सांगायचे तर, कंपनी सोडल्यानंतरही, पीएफ खात्यावर व्याज जमा होत राहील आणि वयाच्या 55 वर्षापर्यंत ते निष्क्रिय होणार नाही.

पीएफच्या रकमेवर आकारला जातो कर

नियमांनुसार, योगदान न दिल्यास पीएफ खाते निष्क्रिय होत नाही, परंतु या कालावधीत मिळालेल्या व्याजावर कर आकारला जातो. पीएफ खाते निष्क्रिय झाल्यानंतरही दावा केला गेला नाही, तर ही रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी (SCWF) मध्ये जाते. तथापि, सात वर्षे खाते निष्क्रिय राहिल्यानंतर दावा न केलेली रक्कम या निधीमध्ये हस्तांतरित केली जाते. EPF आणि MP कायदा, 1952 च्या कलम 17 द्वारे सूट मिळालेले ट्रस्ट देखील ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीच्या नियमांच्या कक्षेत येतात. त्यांना खात्यातील रक्कमही कल्याण निधीमध्ये हस्तांतरित करावी लागेल.

पीएफ खात्यात हस्तांतरित केलेली दावा न केलेली रक्कम 25 वर्षे ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये राहते. यादरम्यान, पीएफ खातेदार रकमेवर दावा करू शकतात. तुम्ही ५५ व्या वर्षी निवृत्त झाल्यास खाते निष्क्रिय होऊ देऊ नका. शक्य तितक्या लवकर अंतिम शिल्लक काढा. वयाच्या 55 ​​वर्षापर्यंत पीएफ खाते निष्क्रिय होणार नाही. तरीही, जुन्या संस्थेतून नवीन संस्थेत पीएफ शिल्लक हस्तांतरित करणे चांगले आहे. यामुळे निवृत्तीनंतर चांगली रक्कम हातात येते.

संबंधित बातम्या:

PF Interest: पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू, ‘असा’ तपासा तुमचा बॅलन्स

मोठी बातमी! मोदी सरकारनं 6.5 कोटी खातेदारांना PF व्याजाची रक्कम पाठवली, तुमच्या खात्यात पैसे आले का?

PF Deposit: पीएफ खात्यामध्ये अजूनही व्याजाचे पैसे आले नाहीत, जाणून घ्या कुठे तक्रार करायची?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.