ATM मधून कसा काढणार PF? सरकाराने केली ही तयारी, एकदा वाचाच
ATM PF Withdrawal : पीएफ खात्यातून ATM मधून पैसे काढण्याची घोषणा झाली. त्यानंतर हा पैसा कसा काढता येईल यावरून संभ्रम निर्माण झाला. अनेक वृत्त समोर येऊ लागली. त्यामुळे EPFO सदस्यांचा गोंधळ उडाला. चला तर जाणून घेऊयात काय आहे ही प्रक्रिया...
आता तो दिवस फार दूर नाही जेव्हा तुम्ही ATM कार्डच्या मदतीने गरजेवेळी तुमचा PF सहज काढू शकाल. पीएफची रक्कम सहजरित्या तुम्हाला काढता येईल. सध्या पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी 20 ते 25 दिवस लागतात. त्यामुळे गरजेवेळी सुद्धा सरकारी आणि खासगी कर्मचार्यांना या कंटाळवाण्या प्रक्रियेतून जावे लागते. कधी कधी वेळेवर अगदी किरकोळ तांत्रिक कारण दाखवून दावा, क्लेम नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व तक्रारींवर थेट रामबाण उपायासाठी EPFO आणि केंद्र सरकार आता आशा योजनेवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला PF खात्यातून ATM च्या माध्यमातून पैसा काढता येईल. पीएफ खात्यातून ATM मधून पैसे काढण्याची घोषणा झाली. त्यानंतर हा पैसा कसा काढता येईल यावरून संभ्रम निर्माण झाला. अनेक वृत्त समोर येऊ लागली. त्यामुळे EPFO सदस्यांचा गोंधळ उडाला. चला तर जाणून घेऊयात काय आहे ही प्रक्रिया…
कसं काम करणार ही सिस्टिम ?
स्पेशल डेबिट कार्ड : EPFO सदस्यांसाठी डेबिट कार्ड आणू शकते. हे डेबिट कार्ड त्यांच्या पीएफ खात्याशी लिंक असेल.
थेट रक्कम काढणे : या कार्डच्या मदतीने तुम्ही कोणत्याही एटीएमवर जाऊन तुमच्या PF खात्यातील रक्कम थेट काढू शकता. ही प्रक्रिया तुमच्या बँक खात्याविना सहज पूर्ण करता येईल.
अर्ज करण्याची झंझट नाही : सध्या PF खात्यातून रक्कम काढण्यासाठी अगोदर ऑनलाईन क्लेम अर्ज दाखल करावा लागतो. पण नवीन सिस्टिम अंतर्गत ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुकर होईल. तुम्ही लागलीच पैसे काढू शकता.
केव्हा काढता येईल तुम्हाला पैसा?
या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पीएफ खात्यातून एटीएमच्या माध्यमातून रक्कम काढण्यात येईल असे वृत्त समोर आले होते. त्यानुसार ईपीएफओ सदस्याला त्याच्या पीएफ खात्यातील जमा रक्कमेतील 50 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय देण्यात येईल. आता पीएफ खात्यातून एटीएमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा मे ते जून 2025 या काळात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. EPFO 3.0 लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना एटीएममधून पीएफ काढता येईल.
वारसदार सुद्धा ATM कार्डच्या माध्यमातून पैसा काढू शकतील?
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदारांना एटीएमचा वापर करुन त्याच्या पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल. पण त्यासाठी वारसदारांचे खाते सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याशी जोडावे लागणार आहे. असूत्रांच्या माहितीनुसार, एकूण पीएफ रक्कमेतील 50% रक्कम काढण्याची सुरुवातीला परवानगी देण्यात येईल. मयताच्या वारसदारांना ATM मधून पैसा काढता येईल. EDLI योजनेतंर्गत मयत सदस्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा करता येईल. ही रक्कम पण एटीएममधून काढता येईल. र्थात याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप ईपीएफओने दिलेली नाही.