नोकरदारांना 7 लाखांचा मोफत विमा, जाणून घ्या काय आहे EPFO ची योजना
EDLI Scheme | खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. EPFO च्या सर्व सदस्यांना हा विमा लागू असतो. यापूर्वी या विमा योजनेची रक्कम 6 लाख रुपये होती.
नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. नोकऱ्या कशाबशा वाचलेले कर्मचारीही वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे एम्पॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Scheme). या योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विम्याची रक्कम सहा लाखावरुन सात लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.
खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. EPFO च्या सर्व सदस्यांना हा विमा लागू असतो. यापूर्वी या विमा योजनेची रक्कम 6 लाख रुपये होती. मात्र, गेल्यावर्षी तत्कालीन केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी ही मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
EDLI Scheme विम्याचे पैसे संबंधित नोकरदाराच्या वारसदाराला मिळतात. एखाद्या कर्मचाऱ्याचा आजारपण किंवा दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम वारसदाराला मिळू शकते. EDLI Scheme साठी नोकरदारांना कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. हे पैसे कंपनीकडून अदा केले जातात. नोकरदारांच्या पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होते. तेवढीच रक्कम कंपनीकडूनही भरली जाते. या 12 टक्के रक्कमेपैकी 8 टक्के पैसे EPS तर 3.66 टक्के पैसे EPF मध्ये जातात. तर EDLI Scheme साठी फक्त कंपनीलाच प्रीमियम भरावा लागतो.
आजारपणाच्या काळात खर्चासाठी पीएफ खात्यातून पैसे काढण्याची सोय
म्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता. या अर्जात आजार आणि रुग्णालयाची संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल. पीएफ खातेधारक स्वत:साठी आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी पैसे घेऊ शकतो. यापूर्वी रुग्णालयाचे बिल दाखवल्यानंतरच पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढता येत होती. मात्र, आता केवळ एक अर्ज दिल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. या सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संबंधित बातम्या:
PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट
आता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया