Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF चे पैसे आले! EPFO ने 8.50% व्याज केलं ट्रान्सफर, असा चेक करा तुमचा बॅलेंस

सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 (Financial Year 2019-20) साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (epfo) 8.5 टक्क्यांचं पूर्ण व्याज (interest rate) दिलं आहे.

PF चे पैसे आले! EPFO ने 8.50% व्याज केलं ट्रान्सफर, असा चेक करा तुमचा बॅलेंस
PPF
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 4:08 PM

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या (New Year) सुरुवातीलाच सरकारकडून (Government) नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 (Financial Year 2019-20) साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (epfo) 8.5 टक्क्यांचं पूर्ण व्याज (interest rate) दिलं आहे. सरकारकडून तब्बल 6 कोटींपेक्षा जास्त ग्राहकांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांआधीच कामगार आणि वित्त मंत्रालयाची व्याज दराशी संबंधित प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये वित्त मंत्रालयाने जोखीम असणाऱ्या गुंतवणूकीबद्दल चिंता व्यक्त करत तपशील मागवून त्यावर चर्चा केली. (epfo send pf interest rate 85 in your account how to check provident fund balance)

दिवाळीला मिळणार होता पहिला पहिला, पण निर्णय बदलला PF Interest credit date 2020)

कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे संतोष कुमार गंगवार (Santosh Kumar Gangwar) यांच्या अध्यक्षतेखालील सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या बैठकीत Covid-19 मुळं ईपीएफओच्या सीबीटीने दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याची घोषणा केली होती. यानुसार, दिवाळीपर्यंत 8.15 टक्के व्याज खात्यात जमा केलं जाईल असं ईपीएफओने ठरवलं होतं. तर उर्वरित 0.35 टक्के हिस्सा समभागांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून दिला जाईल. पण नंतर ईपीएफओने आपला निर्णय बदलून दिवाळीत हप्ता न देता तो आता ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आर्थिक वर्ष 2020 (Financial Year 2020 ) मध्ये ईपीएफवरील व्याज दराच्या 8.50 टक्के व्याज ग्राहकांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

फायदाही डबल

EPFO च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरपर्यंत वाट पाहिल्यामुळे सर्व ग्राहकांना डबल फायदा मिळाला आहे. खातेधारकांच्या खात्यामध्ये व्याज येण्यास थोडा उशिर झाला असला तरी ही चांगली बाब आहे. कारण, EPFO च्या एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या (ETF) विक्रीतून चांगली कमाई झाली आहे. 8.50 टक्के व्याज दिल्यानंतरही EPFO कडे 1,000 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम शिल्लक आहे. सप्टेंबरमध्ये जेव्हा दोन टप्प्यांमध्ये व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी EPFO कडे 500 कोटी रुपये होते. पण आता यामध्येही वाढ झाली आहे.

असा चेक करा EPF खात्यातील बॅलेंस (Check EPF account balance)

1. सगळ्यात आधी Epfindia.gov.in वर लॉगिन करा

2. यानंतर तुमचा UN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरा.

3. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला ई-पासबुकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

4. यामध्ये विचारली गेलेली माहिती भरून ओके बटनावर क्लिक करा.

5. यानंतर मेंबर आयडी उघडा

6. हे केल्यानंतर आपोआपच तुम्ही EPFO खात्यामधील एकूण बॅलेंस पाहू शकता. (epfo send pf interest rate 85 in your account how to check provident fund balance)

संबंधित बातम्या – 

पासपोर्टसाठी डिझाईन करा लोगो आणि टॅगलाईन, सरकार देईल 25 हजारांचं बक्षिस

पॅनकार्ड फक्त ‘या’ दोन कंपन्यांकडूनच तयार करा; अन्यथा…

PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग प्रत्येक महिन्याची 5 तारीख विसरू नका, ‘हे’ आहे कारण

(epfo send pf interest rate 85 in your account how to check provident fund balance)

'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार.
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले....
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?.
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल.
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?.
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत.
पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट
पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट.
'..असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात'; बावनकुळेंनी ओढले ताशेरे
'..असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात'; बावनकुळेंनी ओढले ताशेरे.
मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?
मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?.
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस.