EPFO : गरजेच्या वेळी काढता येणार पैसा, वारंवार दावा फेटाळण्याची नको चिंता, ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना देणार फायदा

EPFO : कर्मचाऱ्यांना ईपीएफओने मोठा दिलासा दिला आहे..

EPFO : गरजेच्या वेळी काढता येणार पैसा, वारंवार दावा फेटाळण्याची नको चिंता, ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना देणार फायदा
दाव्याची चिंता नकोImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 8:41 PM

नवी दिल्ली : जरी तुमचा EPF दावा वारंवार नामंजूर होत असेल तर आता त्यासाठी जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण निकडीच्यावेळी तुम्हाला आता रक्कम काढता येणार आहे. भविष्य निर्वाह कर्मचारी संघटनेने (EPFO) याविषयी देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांना पत्र पाठवलं आहे. त्यांनी पत्रात दावे (Claim) निकाली काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्याचे टाळण्यात येईल. तसेच दावा का फेटाळण्यात येत आहे, याची सुस्पष्ट कारण सदस्याला द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता कार्यालयांवर दबाव आला आहे.

EPFO ने सर्वात अगोदर प्रत्येक दावा तपासण्याचे, बारकाईने त्याची गरज लक्षात घेण्याचे निर्देश दिले आहेत. एकाच कारणासाठी वारंवार दावे फेटाळण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईपीएफओने याविषयी कडक भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांना निकडीच्यावेळी रक्कम मिळावी यासाठी निर्देश देण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांनी एकाच कारणासाठी किती क्लेम रिजेक्ट केले, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. महिन्याभराच्या डेटानुसार हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवायचा आहे. काही क्षेत्रीय कार्यालयात कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्यासाठी स्वतःचाचे नियम हाकत असल्याचे उघड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

या चुकीच्या नियमावलीमुळे कर्मचाऱ्यांना गरजेच्यावेळी रक्कम मिळण्यात अडचण येत होती. कर्मचाऱ्यांनी याविषयी संघटनेकडे तक्रार केली. अशा तक्रारींची संख्या वाढल्यानंतर दावा फेटाळण्यासंबंधीचे नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे आता दावा फेटाळण्याची कारणे द्यावी लागणार आहेत.

आता छोट्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती योजना आणि विम्याचा लाभ मिळेल. कंपन्यांना यामध्ये त्यांचा वाटा देता येणार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, केंद्र सरकार त्यासाठी लवकरच नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे अगदी 10 कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कामगारांनाही लाभ मिळणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.