नोकरदारासांठी मोठी बातमी, EPFO 6 कोटी खातेधारकांना ‘या’ कारणामुळे पैसे पाठणार

ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 6 कोटी खातेधारकांच्या खात्यामध्ये व्याज जमा करणार आहे. EPFO credit interest rate

नोकरदारासांठी मोठी बातमी, EPFO 6 कोटी खातेधारकांना 'या' कारणामुळे पैसे पाठणार
EPFO
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 11:26 AM

नवी दिल्ली: केंद्रीय श्रम मंत्रालयानं देशातील 6 कोटी नोकरदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 6 कोटी खातेधारकांच्या खात्यामध्ये व्याज जमा करणार आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयानं या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. जुलै महिन्याच्या शेवटी नोकरदारांच्या खात्यात व्याज जमा केलं जाणार आहे. (EPFO will credit interest rate on provident fund depositors account in July)

किती टक्के व्याज मिळणार?

केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज देण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता. गेल्या सात वर्षांमधील हा सर्वात कमी व्याज दर आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के होता. तर, 2019-20 मध्ये EPFO खातेधारकांना व्याज मिळवण्यासाठी तब्बल 8 ते 10 महिने वाट पाहावी लागली होती.

व्याज कधी जमा होणार?

झी बिझनेसनं दिलेल्या बातमीनुसार 6 कोटी खातेधारकांच्या खात्यात प्रॉव्हिडंड फंड खात्यावरील व्याज जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत जमा केलं जाईल. केंद्रीय श्रम मंत्रालयानं याला मंजुरी दिली आहे.

मार्च महिन्यात श्रीनगरमध्ये श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता.

कोविड 19 अ‌ॅडव्हान्स काढता येणार

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या काळात केंद्र सरकारने ईपीएफओ खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने खातेधारकांना त्यांच्या पीएफ अकाउंट मधून तीन महिन्याची जमा रक्कम अ‌ॅडव्हान्स स्वरूपात काढण्यासाठी मुभा दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत देखील सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिली होती.

नेमकी किती रक्कम काढता येईल?

ईपीएफओने जाहीर केलेल्या निर्णयानुसार खातेधारक कर्मचारी कोविड-19 अ‌ॅडव्हान्स सुविधेचा वापर करून पैसे काढू शकतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झालेल्या रकमेपैकी 75 टक्के किंवा तीन महिन्यांच्या मूळ पगाराच्या बरोबरची रक्कम काढता येईल. यासंदर्भात केंद्रीय श्रम मंत्रालयानं एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.

संबंधित बातम्या:

नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ खात्यात पाठवणार पैसे

PF Account मध्ये अशी अपडेट करा बँकेची माहिती; फक्त तीन टप्पे आणि काम फत्ते

(EPFO will credit interest rate on provident fund depositors account in July)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.