वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

आयनॉक्स समूहाचे (Inox group) कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन (Siddhartha Jain) यांनी दक्षिण मुंबईतील (Mumbai) वरळी परिसरात एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. विशेष म्हणजे हे अपार्टमेंट समुद्र किनाऱ्यावर आहे. सिद्धार्ध जैन यांनी खरेदी केलेल्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल 144 कोटी रुपये आहे.

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी
Image Credit source: mint
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:20 AM

मुंबई : आयनॉक्स समूहाचे (Inox group) कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन (Siddhartha Jain) यांनी दक्षिण मुंबईतील (Mumbai) वरळी परिसरात एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. विशेष म्हणजे हे अपार्टमेंट समुद्र किनाऱ्यावर आहे. सिद्धार्ध जैन यांनी खरेदी केलेल्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल 144 कोटी रुपये आहे. 144 कोटी रुपयांमध्ये हा सौदा झाला आहे. ही मालमत्ता जैन यांनी रहेजा युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आशिष रहेजा यांच्याकडून खरेदी केली आहे. 31 मार्च रोजी हा व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून, या व्यवहारासाठी जैन यांनी तब्बल 7.20 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. या व्यवहारांबाबत बोलताना सीआरई मॅट्रिक्स आणि इंडेक्सटॅपचे सीईओ अभिषेक किरण गुप्ता यांनी म्हटले आहे की, सध्या मुंबईमध्ये लक्झरी घरांना मोठ्याप्रमाणात मागणी आहे. विशेष: अशी मालमत्ता जर प्राईम लोकेशनला असेल तर चढ्या दराने देखील ती मालमत्ता खरेदी केली जाते. असे अनेक व्यवहार यापूर्वी देखील मुंबईत झाले आहेत.

‘अशी’ आहे ही अपार्टमेंट

आयनॉक्स समूह मनोरंजन, औद्योगिक वायू आणि क्रायोजेनिक्स उपकरणाच्या क्षेत्राशी संबंधित आहे. आयनॉक्स समुहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी ही अपार्टमेंट खरेदी केली आहे. तब्बल 144 कोटी रुपयांना हा व्यवहार झाला. ही अपार्टमेंट अलिशान असून, वरळी सारख्या प्राईम लोकेशनला आहे. सध्या मु्ंबईतील वरळी परिसरातील घरांना मोठी मागणी आहे. या अपार्टमेंटमध्ये प्रशस्त फ्लॅट असून, तब्बल वीस गाड्या एकाच वेळी पार्क करता येतील एवढे पार्कींग आहे. ही इमारत सर्व सोईसुविधांनी युक्त अशी आहे. 31 मार्च रोजी हा व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.

वरळी परिसरातील लक्झरी घरांना मागणी

दरम्यान यापूर्वी देखील मालमत्ता खरेदी विक्रीचे असे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी एसआयएल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या कंपनीने रहेजा लीजेंडमध्ये 78 कोटी रुपयांना डुप्लेक्स अपार्टमेंट विकत घेतले. होते. त्यानंतर एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे ​​मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन आणि त्यांच्या पत्नीने देखील वरळी सी फेस परिसरात तब्बल 19.36 कोटींना अपार्टमेंट खरेदी केली होते. तर 2021 मध्येच एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांच्या पत्नी स्मिता डी. पारेख यांनी वरळीमध्येच पन्नास कोटींना एक अपार्टमेंट खरेदी केली होती.

संबंधित बातम्या

GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना

Textile | कापड उद्योगाला सरकारचे पाठ’बळ’ ! प्रोत्साहन योजनेत 61 प्रस्तावांना मंजुरी; 2.4 लाख नोकऱ्यांचा राजमार्ग तयार

Russia Ukraine Crisis : इन्फोसिस रशियामधून आपला व्यवसाय गुंडाळणार, युक्रेनला 10 लाख डॉलरची मदत

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.