Inflation Pulses Rate : सणासुदीच्या काळात महागाईचा मार, एका वर्षात इतकी भडकली तूरडाळ
Inflation Pulses Rate : डाळीच्या किंमतींनी सध्या केंद्र सरकारची झोप उडवली आहे. अनेक प्रयत्नानंतरही डाळीच्या किंमती आटोक्यात आलेल्या नाहीत. गेल्या वर्षी तूरडाळीच्या किंमतीत इतक्या रुपयांची दरवाढ झाली आहे. चना डाळमध्ये तर 18 टक्के महागाई आली आहे.
नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : महागाई (Inflation) कमी होण्याचे नाव घेईना. एक वस्तू स्वस्त झाली की, दुसरी वस्तू महाग होते. टोमॅटो आणि हिरव्या भाजीपालाच्या किंमतीत घसरण झाली आहे. पण डाळीच्या किंमती मागे हटायला तयारी नाहीत. डाळीच्या किंमतींनी महागाईला आग लावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून डाळी गायब झाल्या आहेत. तूरडाळीच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात तूर डाळीने किंमतीत (Turdal Rate) आघाडी घेतली.2022-23 या वर्षात कृषी मंत्रालयाने तिसऱ्यांदा उत्पादनाचा आकडा अंदाज वर्तवला. हा अंदाज सातत्याने घसरत आहे. 42.2 लाख टनाहून हा आकडा थेट 34.3 लाख टनावर आला आहे. गेल्या वर्षी तूरडाळीच्या किंमतीत इतक्या रुपयांची दरवाढ झाली आहे. चना डाळमध्ये तर 18 टक्के महागाई आली आहे
तूरडाळीत सर्वाधिक वाढ
तूरडाळीच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. एका वर्षांत तूरडाळीच्या किंमतीत 52 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षांत तूरडाळीच्या किंमतीत 45 टक्क्यांची उसळी आली आहे. मागणी वाढल्याने डाळीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तूरडाळीसोबतच चनाडाळ, मुगडाळ महागली आहे.
118 रुपये किलो मुगडाळ
ग्राहक मंत्रालयानुसार, दिल्लीत सोमवारी तूरडाळीचा भाव 167 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. एक वर्षापूर्वी या डाळीचा भाव 115 रुपये होता. गेल्या एका वर्षात तूरडाळीच्या भावात 52 रुपयांची वाढ झाली. चना डाळमध्ये एका वर्षात 18 टक्क्यांची वाढ झाली. दिल्लीत चनाडाळची किंमत 85 रुपये होती. मुगडाळीत एका वर्षात 18 टक्क्यांची वाढ झाली. मुगडाळीची किंमत 118 रुपये आहे. आता सणासुदीच्या काळात डाळीच्या किंमती वाढल्याने जनता मेटाकुटीला आली आहे.
खरीफ हंगामात उत्पादनात घसरण
कृषी मंत्रालयाच्या आकड्यानुसार, 8 सप्टेंबर रोजीपर्यंत खरीप हंगामातील डाळीचे उत्पादन घसरण असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डाळीचे उत्पादन घसरणार आहे. गेल्यावर्षी 8 सप्टेंबरपर्यंत 119.91 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळवर्गीय पिकांची पेरणी झाली होती. या 8 सप्टेंबरपर्यंत 11.26 लाख हेक्टरवर कमी पेरणी झाली आहे.
तांदळाची दरवाढ
अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने या आठवड्यात आकडेवारी संसदेसमोर मांडली. तांदळाच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार ठेवत आहे. पण गेल्यावर्षीपासून किंमती सूसाट आहे. त्यातच निसर्गचा फटका बसल्याने तांदळाने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी तांदळाची सरासरी किंमत 41 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाली. गेल्यावर्षी हा भाव 37 रुपये होता.