दिलासादायक! फेब्रुवारीमध्ये निर्यात वाढली, 22 टक्क्यांच्या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर

गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील निर्यात मंदावली आहे. मात्र दुसरीकडे भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये तब्बल 22.36 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

दिलासादायक! फेब्रुवारीमध्ये निर्यात वाढली, 22 टक्क्यांच्या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 8:03 AM

गेल्या आठ दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील निर्यात (Export) मंदावली आहे. मात्र दुसरीकडे भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये तब्बल 22.36 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र या काळात वित्तीय तूट देखील वाढली आहे. व्यापारी तूट वाढून 21.19 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. व्यापर आणि वाणिज्य मंत्रालयाकडून बुधवारी याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार आयातीमध्ये देखील 35 टक्क्यांची वाढ झाली असून, फेब्रुवारी महिन्यात आयात 55 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये देखील वाढ झाली आहे. कच्चा तेलाच्या आयातीत 66.56 टक्क्यांची वाढ झाली असून, ती 15 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये आयात आणि निर्यातीच्या फरकातून होणाऱ्या तोट्याचे अंतर 13.12 डॉलर इतके होते.

चालू आर्थिक वर्षात निर्यातीत 46 टक्क्यांची वाढ

वाणिज्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधित निर्यातील 45.80 टक्क्यांची वाढ होऊन, निर्यात 374.05 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याच्या मागील वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये एकूण निर्यात 256.55 अब्ज डॉलर एवढी झाली होती. चालू आर्थिक वर्षात आयातीमध्ये देखील वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या अकरा महिन्यांच्या कालावधीत आयातीत 59.21 टक्क्यांची वाढ झाली असून, एकूण आयात 550.12 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. तसेच चालू वर्षात व्यापारी तोट्यात देखील वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

कोरोना संकट कमी झाल्याचा परिणाम

याबाबत बोलताना भारतीय निर्यात संघटन महासंघ फियोने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे पुरवठा साखळी खंडीत झाली. त्याचा परिणाम हा आयात, निर्यातीवर दिसून आला. मात्र यंदा कोरोना संकट कमी झाले, त्यामुळे पुरवठा साखळी सुरुळीत होण्यास मदत झाली. परिणामी निर्यात देखील वाढली.

संबंधित बातम्या

पुढील आठवड्यात इंधन दरवाढ; पेट्रोलचे भाव नऊ रुपयांनी वाढणार?

7 लाखांचा विमा तोही अगदी मोफत; जाणून घ्या ‘ईडीएलआय’बद्दल

शेअर बाजाराला युद्धाचे ग्रहण, बाजार कधी सावरणार? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.