Fact Check : मोदी सरकार महिलांच्या खात्यात जमा करणार 60 हजार?

केंद्र सरकार 'महिला शक्ती योजने' (Mahila Shakti Yojana) अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 60,000 रुपये जमा करणार आहे असा दावा करण्यात आला आहे.

Fact Check : मोदी सरकार महिलांच्या खात्यात जमा करणार 60 हजार?
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 10:25 AM

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आताही असाच एक व्हीडिओ यूट्यूबवर (Youtube) प्रसिद्ध झाला आहे. या व्हीडिओमध्ये केंद्र सरकार ‘महिला शक्ती योजने’ (Mahila Shakti Yojana) अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 60,000 रुपये जमा करणार आहे असा दावा करण्यात आला आहे. पण या व्हीडिओ प्रत्यक्षात खरा आहे का? की फसवणुकीसाठी आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. (fact check modi government depositing rs 60000 in women bank know real truth)

पीआयबी फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हीडिओ बनावट असून यातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहिती जाणून घ्या आणि सतर्क राहा असंही पीआयबी फॅक्ट चेकने सांगितलं आहे.

काय आहे नेमका व्हीडिओ?

कोरोना संकटात महिलांच्या खात्यात मोदी सरकारने तीन हप्त्यांमध्ये 1,500 रुपये जमा केले होते. पण सध्या व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये महिलांच्या बँक खात्यात 60 हजार रुपये जमा करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘महिला शक्ती योजने’अंतर्गत केंद्र सरकार सर्व महिलांच्या बँक खात्यात 60 हजारांची रोख रक्कम देणार असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. पण हा व्हीडिओ बनावट असल्याचं समोर आलं आहे.

जाणून घ्या काय आहे सत्य?

ही व्हायरल पोस्ट बनावट असल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्वीटदेखील केलं आहे. केंद्र सरकार महिला शक्तीसारखी अशी कोणतीही योजना चालवत नसल्याचं पीआयबीने म्हटलं आहे.

तुम्हीही असा करा फॅक्टचेक

असा कुठलाही मेसेज आला तर तुम्ही याची अधिकृत माहिती मिळवू शकता. यासाठी https://factcheck.pib.gov.in/ या वेसबाईटवर किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर फॅक्ट चेकसाठी पीआयबीला पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे. (fact check modi government depositing rs 60000 in women bank know real truth)

इतर बातम्या – 

महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?

वर्कफ्रॉम होममुळे कंपन्यांची मोठी आर्थिक बचत; ऑफिस खरेदीवरही परिणाम

(fact check modi government depositing rs 60000 in women bank know real truth)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.