GST ची खोटी बिलं सादर करणाऱ्यांना CBIC चा दणका, 365 जणांना अटक
CBIC ने GST ची खोटी बिलं सादर करणाऱ्यांना दणका दिला आहे. 12 हजार प्रकरणांमध्ये 365 जणांना अटक करण्यात आलीय. cbic fake GST invoice
नवी दिल्ली: जीएसटीची बनावट बिलं तयार करुन केंद्र सरकारची फसवणूक करणाऱ्यांना CBIC नं दणका दिला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने खोटी बिलांप्रकरणी 12 हजार प्रकरणांमध्ये 365 जणांना अटक केली आहे. CBIC नं याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. सीबीआयसीनं यासोबत बनावट बिलं सादर करुन GSTची चोरी करणाऱ्या 165 जणांना मागील सहा आठवड्यांमध्ये अटक केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये GST बाबत पसरवण्यात आलेल्या अफवांवर देखील केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (fake GST invoice menace CBIC department debunks misinformation about rule change)
अफवा: जीएसटी नोंदणी रद्द करताना बाजू मांडण्याची संधी दिली नाही.
स्पष्टीकरण: केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागानं या अफवेवर स्पष्टीकरण दिलं आहे. जीएसटी कायदे संसदेत आणि राज्य विधिमंडळांनी मंजूर केले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येते. आगामी काळाता ज्यांनी जी सहा किंवा त्याहून अधिक रिटर्न्स भरली नाहीत त्यांना जीएसटी नोंदणी कायद्यानुसार रद्द होईल. असं सीबीआयसीनं स्पष्ट केले. जीएसटी नोंदणी रद्दबातल कोणत्याही कारणाशिवाय केले जाईल, ही पसरवलेली अफवा चुकीची आहे,CBIC नं स्पष्ट केले. शासनाला मिळणाऱ्या महसुलाचे रक्षण करण्यासाठी ही तरतूद कायद्यात ठेवण्यात आली आहे. यामुळे फसवणूक करणाऱ्यांना ग्राहकांकडून गोळा केलेल्या जीएसटीतून पळून जाता येणार नाही.
सीबीआयसीने प्रसिद्धीपत्रकात करदात्यासा सुनावणीची योग्य संधी दिल्याशिवाय नोंदणी रद्द होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. “बेकायदेशीर ऑपरेटर सिस्टममध्ये गेमिंग करून मोठ्या स्वरुपात बनावट पत जमा करण्याचा जे प्र्यत्न करतात त्यांची जीएसटी नोंदणी रद्द करण्यात येईल, असं सीबीआयसीनं स्पष्ट केले. अशा प्रकरणांमध्ये प्रामाणिकपणे जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे.
केंद्रीयअप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचे ट्विट
Myths v. Facts on CGST Notification issued on 22.12.2020 to curb GST Fake invoice frauds. pic.twitter.com/xoPVUjhTuK
— CBIC (@cbic_india) December 23, 2020
अफवा: जीएसटीचे विवरण भरताना चूक झाल्यास जीएसटी नोंदणी रद्द होईल.
स्पष्टीकरण: CBICने ही अफवा देखील फेटाळून लावली आहे. जीएसटीचे विवरण भरताना कारकूनी स्वरुपाची चूक झाल्यास नोंदणी रद्द केली जाणार नाही. मात्र, बनावट बीलं सादर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं सीबीआयसीनं स्पष्ट केले. जीएसटीमधील खोटी बिलं सादर करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयसी अत्याधुनिक प्रणालींचा वापर केला जातो, अशी माहिती देण्यात आली आहे.
अफवा: प्रस्तावित बदलांमुळे जीएसटीची कार्यपद्धती बदलेल.
स्पष्टीकरण: केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डानं जीएसटीची कार्यपद्धती बदलेल हीअफवा फेटाळली आहे. जीएसटीच्या प्रणालीचा वापर करुन फसवणूक करणारे प्रामाणिकपणे जीएसटी भरणाऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवतात, असं सीबीआयसीनं म्हटलं. यामुळे बनावट बिलांद्वारे फसवणूक करणाऱ्यांच्या शोध घेणे काळाची गरज आहे,असं सीबीआयसीनं सांगितलं आहे.
बनावट बिलं दाखल करुन फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आयकर विभाग, बँका, सीमाशुल्क यांच्याकडून आकडेवारी गोळा केली जात आहे. जीएसटी प्रणालीच्या गैरवापरासह फसवणूक करण्याऱ्यांची नोंदणी रद्द करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आधुनिक माहिती विश्लेषणाची प्रणाली वापरुन बनावट बिलांद्वारे फसवणूक करणाऱ्यांना ओळखलं जाईल. यामुळे जीएसटीच्या कार्यपद्धतीवर कोणताही परिणाम होणारी नाही, असं सीबीआयसीनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. जीएसटी नोंदणी प्रणाली, रिफंड, ऑटोमेटिक पद्धतीत काही प्रमाणात कागदपत्रांची तपासणी होईल, असं सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या:
कमी पैशांच्या गुंतवणुकीवर कुटुंबाची चिंता विसरा, खास आहे LIC ची जीवन अमर पॉलिसी
New Year ला आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, 1 जानेवारीपासून होणार पगार वाढ
(fake GST invoice menace CBIC department debunks misinformation about rule change)