ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेने एफडीचे व्याजदर बदलले, पाहा नवे दर
खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या ॲक्सिस बँकेने (Axis Bank) मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ॲक्सिस बँकेने 5 मार्च 2022 पासून मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात बदल केला आहे.
खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या ॲक्सिस बँकेने (Axis Bank) मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ॲक्सिस बँकेने 5 मार्च 2022 पासून मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात बदल केला आहे. ॲक्सिस बँकेत 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कालावधीत मुदत ठेवीत गुंतवणूक करता येते. सध्याच्या सुधारणेनंतर ॲक्सिस बँक 18 महिन्यांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व (Maturity) होणाऱ्या 2 कोटींपेक्षा कमी जमा मुदत ठेवींसाठी 5.25 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवीवर 2.5 ते 6.50 टक्के व्याज मिळेल. याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक या बँकांनी आपल्या मुदत ठेव व्याजदरात बदल केला होता. ॲक्सिस बँक 2 वर्षांच्या पण 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 5.40 टक्के व्याज देणार आहे. 3 वर्षांपेक्षा जास्त ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर बँकेचा व्याजदर 5.40 टक्के असेल.
5 वर्ष ते 10 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर तुम्हाला 5.75 टक्के व्याज मिळेल. 7 दिवस ते 14 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 2.50 टक्के, 15 दिवस ते 29 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 2.50 टक्के, 30 ते 45 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 3 टक्के, 46 ते 60 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 3 टक्के, 61 ते 3 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर 3.50 टक्के, 3 ते 4 महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 30 दिवस ते ४ महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 4 ते 5 महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 5 ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.50 टक्के, 6 ते 7 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के, 7 ते 8 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के, 8 ते 9 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के, 9 ते 10 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के व्याज मिळेल.
याशिवाय ॲक्सिस बँक 10 ते 11 महिन्यांच्या एफडीवर 4.40 टक्के, 11 महिने आणि 11 महिने 25 दिवसांच्या एफडीवर 4.40 टक्के, 1 वर्ष आणि 1 वर्ष 5 दिवसांच्या एफडीवर 5.10 टक्के, 1 वर्ष 5 दिवस आणि 1 वर्ष 11 दिवसांच्या एफडीवर 5.15 टक्के, 1 वर्ष 25 दिवस आणि 13 महिन्यांच्या एफडीवर 5.15 टक्के, 13 महिने आणि 14 महिन्यांच्या एफडीवर 5.15 टक्के, 14 महिने ते 15 महिन्यांच्या एफडीवर 5.15 टक्के व्याज दिले जात आहे.
ॲक्सिस बँक 15 ते 16 महिन्यांच्या एफडीवर 5.20 टक्के, 16 ते 17 महिन्यांच्या एफडीवर 5.20 टक्के, 17 ते 18 महिन्यांच्या एफडीवर 5.20 टक्के, 18 महिने ते 2 वर्षांच्या एफडीवर 5.25 टक्के, 2 वर्षे ते 30 महिन्यांच्या एफडीवर 5.40 टक्के, 30 महिने ते 3 महिन्यांच्या एफडीवर 5.40 टक्के, 3 ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर 5.40 टक्के आणि 5 ते 10 वर्षे एफडीवर 5.75 टक्के व्याज दर असेल.
हेही वाचा:
शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्समध्ये तब्बल 1375 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका