Paytm बँकेची जबरदस्त योजना, 13 महिन्यांच्या FDवर डायरेक्ट मिळणार 7 टक्के व्याज
मागच्या काही काळात SBI, ICICI, HDFC सह अनेक बँकांमध्ये एफडी (FD) दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
नवी दिल्ली : सध्या वाढती महागाई आणि भविष्याचा विचार करता बचत करणं महत्त्वाचं आहे. गुंतवणूक आणि बचतीसाठी अनेक योजना बाजारात आहेत. यातलीच एक सगळ्यात खास आणि उपयोगी योजना म्हणजे मुदत ठेव (Fixed Deposits). मागच्या काही काळात SBI, ICICI, HDFC सह अनेक बँकांमध्ये एफडी (FD) दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही 7 टक्के दरावर एफडी सुविधेचा फायदा घेऊ शकता. पेटीएम पेमेंट्स बँकने (Paytm Payments Bank) एफटी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. (fd scheme paytm payments bank 13 months fd get 7 percent interest)
indusind बँकेसोबत भागीदारी खरंतर, पेमेंट्स बँकांना मुदत ठेवीची सुविधा देण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकने indusind बँकेसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये व्याज दर हा indusind बँकेकडून ठरवला जातो.
फक्त 13 महिन्यांचा मॅच्युअरिटी पीरियड पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये एफजीचा मॅच्युअरिटी पीरियड हा 13 महिन्यांचा आहे आणि यावर 7 टक्के व्याज देण्यात आलं आहे. या एफडीचं खास वैशिष्ट्यं म्हणजे मॅच्युअरिटी पीरियड पूर्ण झाल्यानंतर एफडी तोडण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही 7 दिवसांच्या आत एफडी तोडली तर मात्र तुम्हाला यावर कोणतंही व्याज मिळणार नाही.
काय आहे इतर बँकांचा व्याजदर?
>> एयू स्मॉल फायनान्स बँक – इथे तुम्हालाा 7 टक्के दराने व्याज मिळेल.
>> डीसीबी बँक – या बँकेमध्ये 6.95 टक्के दराने व्याज मिळत आहे. तर 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर व्याजदर वाढून एकूण रक्कम 2,11,696 रुपये होईल.
>> आयडीएफसी बँक – या बँकेत 6.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. डीसीबी बँकेमध्ये 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांनंतर एकूण रक्कम 2,09,625 रुपये होईल.
(fd scheme paytm payments bank 13 months fd get 7 percent interest)
>> आरबीएल बँक – ही बँक 5 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज देते. इथे तुम्हाला 1.5 लाख रुपयांवर 5 वर्षानंतर 2,09,625 रुपये मिळतील.
>> यस बँक – इथे 6.25 टक्के दराने व्याज मिळत असून, 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 2,09,625 रुपयांचा फायदा होईल.
>> Deutsche Bank आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक – 5 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याजदर मिळतो. इतकंच नाही तर 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांनी याची एकूण रक्कम वाढत 2,02,028 रुपये होईल.
>> बंधन बँक – 5 वर्षांच्या एफडीवर तुम्हाला या बँकेत 6 टक्क्यांनी व्याज मिळेल. तर 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर तुमची एकूण रक्कम 2,02,028 कोटी रुपये होईल.
संबंधित बातम्या –
Flipkart आणि Amazon सगळ्यात मोठा सेल, ‘या’ फोनवर मिळणार 10 हजारांपर्यंत डिस्काऊंट
पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 5 आणि 10 रुपयांची नाणी विका, लखपती व्हा
Navi Mumbai | भाजीपाला महागला, मात्र कोथिंबिरीच्या दरात मोठी घसरण – tv9 pic.twitter.com/7IidpkoIPO
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
(fd scheme paytm payments bank 13 months fd get 7 percent interest)