सरकारी ते खासगी ‘या’ बँकेकडून फेस्टिव्ह ऑफर सुरू, होम-ऑटो-एज्युकेशन कर्जावर अनेक फायदे
गृह कर्जाबद्दल बोलताना प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले गेलेय. याशिवाय क्विक लोन प्रोसेसिंग फी आणि लवचिक परतफेडीचा पर्याय देण्यात आलाय. यापूर्वी एसबीआय, एचडीएफसी बँकेसह अनेक बँकांनी सणवार ऑफर अंतर्गत गृहकर्ज आणि इतर ग्राहक कर्जावर विविध ऑफर जाहीर केल्यात.
नवी दिल्लीः सणासुदीच्या आधी आयडीबीआय बँकेने गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह ग्राहक कर्जावर विविध ऑफरची घोषणा केलीय. बँक ऑटो लोन, एज्युकेशन लोन, होम लोनवर विविध ऑफर्स घेऊन आलीय. सणासुदीच्या आधी एसबीआय, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रासह अनेक बँकांनी बंपर ऑफर आणल्यात. वाहन कर्जाबद्दल बोलायचे झाल्यास हाय-एंड बाईक्स आणि नवीन कारच्या खरेदीवर 100% बँक वित्तपुरवठा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त कर्ज पूर्व-बंद किंवा आंशिक बंद केल्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. यासह व्याजदरदेखील अतिशय आकर्षक ठेवण्यात आलाय.
प्रक्रिया शुल्क माफ
गृह कर्जाबद्दल बोलताना प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले गेलेय. याशिवाय क्विक लोन प्रोसेसिंग फी आणि लवचिक परतफेडीचा पर्याय देण्यात आलाय. यापूर्वी एसबीआय, एचडीएफसी बँकेसह अनेक बँकांनी सणवार ऑफर अंतर्गत गृहकर्ज आणि इतर ग्राहक कर्जावर विविध ऑफर जाहीर केल्यात. सध्या गृह कर्जावरील व्याजदर एका दशकात सर्वात कमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2020 पासून धोरण दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Wish to study abroad? Make your dream come true with an IDBI Bank Education Loan. To know more, visit: https://t.co/JuKVifPxtR pic.twitter.com/o9GNBrMUFc
— IDBI BANK (@IDBI_Bank) October 6, 2021
…तर तो या कर्जाचा लाभ घेऊ शकतो
IDBI ने विद्यार्थ्यांसाठी i_learn एज्युकेशन लोन सादर केले. जर एखादा विद्यार्थी विशेष अभ्यास करत असेल किंवा परदेशात जात असेल, तर तो या कर्जाचा लाभ घेऊ शकतो. या कर्जाचा परतफेड कालावधी लांब ठेवण्यात आलाय.
संबंधित बातम्या
IRCTC चा शेअर आठवड्याभरात 20 टक्क्यांनी वाढला, पैसे कमावण्याची संधी
आता पेन्शनची ही सुविधा डिजिलॉकरवर उपलब्ध, 23 लाख कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ
Festive offer launched from public to private ‘Ya’ bank, many benefits on home-auto-education loan