‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डाद्वारे सिनेमाची तिकिटे बुक करण्यावर 50 टक्के सूट, जाणून घ्या
चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहणारे प्रेक्षक चित्रपटगृह सुरू होताच आपले कुटुंबीय, मित्रपरिवार आणि जवळच्या मित्रमंडळींसह चित्रपट पाहण्यास येणार आहेत. मात्र, चित्रपटगृहात जाणे टाळणाऱ्यांची कमी नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सिनेमा हॉल, बँका, बुकिंग अॅप्स विविध ऑफर्स देत आहेत.
नवी दिल्लीः भारतात कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आलेय. मात्र, आपल्या देशात महामारीचा धोका संपला आहे, असे अजिबात नाही. याशिवाय देशातील साथीच्या तिसऱ्या लाटेबाबत अद्यापही चित्र अस्पष्ट आहे. बरं कोविड 19 ची सद्यस्थिती पाहता केंद्र आणि राज्य सरकार अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत. या क्रमाने सरकारने आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांसह सिनेमा हॉल सुरू करण्यास परवानगी दिलीय. सिनेमागृहात चित्रपटाचा आनंद घेण्यासोबतच प्रेक्षकांनी कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सिनेमा हॉल सुरू झाल्यानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहाकडे वळू लागलेत.
प्रदीर्घ कालावधीनंतर सिनेमागृहे पुन्हा सुरू
चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहणारे प्रेक्षक चित्रपटगृह सुरू होताच आपले कुटुंबीय, मित्रपरिवार आणि जवळच्या मित्रमंडळींसह चित्रपट पाहण्यास येणार आहेत. मात्र, चित्रपटगृहात जाणे टाळणाऱ्यांची कमी नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सिनेमा हॉल, बँका, बुकिंग अॅप्स विविध ऑफर्स देत आहेत. देशातील सातवी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ‘इंडियन बँक’ आपल्या ग्राहकांना चित्रपटाच्या तिकिटांच्या खरेदीवर जबरदस्त ऑफर देत आहे. होय, इंडियन बँक आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना BookMyShow द्वारे तिकीट बुक करण्यावर 50 टक्के सूट देत आहे. मात्र, त्यासाठी काही अटी व शर्थीही घालण्यात आल्यात.
ऑफरचा लाभ घेण्यासाठी या अटी असतील
तुमच्याकडे इंडियन बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बुक माय शोला भेट देऊन चित्रपटाची तिकिटे बुक करावी लागतील. ऑफर अंतर्गत तुम्ही महिन्यातून एकदाच एक कार्ड घेऊ शकता. तिकीट बुकिंगवर तुम्हाला 50 टक्के झटपट सूट मिळेल. तथापि, तुम्ही एका वेळी कमाल रु.250 ची सूट घेऊ शकता. ही ऑफर या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध आहे.
The theatres have now reopened and it’s time to make the most of it. Book your tickets through BookMyShow with an Indian Bank RuPay Credit Card and enjoy 50% off. Get booking, now! https://t.co/nLsjJX5I9X #IndianBank #Offers #Rupay #AmritMahotsav#DFSIndiaCelebratesAmritMahotsav pic.twitter.com/3KKuoXs5WK
— Indian Bank (@MyIndianBank) November 13, 2021
संबंधित बातम्या
11 रुपयांपासून सुरू झालेला हा शेअर आज 78,000 रुपयांवर पोहोचला, पेटीएमचीही स्थिती काय?
व्होटर कार्ड हरवले? आता नो टेन्शन, घरबसल्या बनवा दुसरं व्होटर कार्ड, प्रक्रिया काय?