Digital Currency : पहिल्याच दिवशी डिजिटल रुपयाने घेतली का हनुमान उडी? 4 बँकांच्या खाद्यांवर या चलनाचा भार..

Digital Currency : देशात डिजिटल रुपयाची सुरुवात झाली आहे.. पायलट प्रकल्पात किती झाली उलाढाल..

Digital Currency : पहिल्याच दिवशी डिजिटल रुपयाने घेतली का हनुमान उडी? 4 बँकांच्या खाद्यांवर या चलनाचा भार..
इतकी झाली उलाढालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 5:12 PM

नवी दिल्ली : देशात 1 डिसेंबरपासून किरकोळ डिजिटल रुपयाची (Retail Digital Rupee) सुरुवात झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पहिल्याच दिवशी 1.71 कोटी रुपयांचे डिजिटल चलन जारी केले. पायलट प्रकल्पातील चार बँकांनी या चलनाची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपयाची सुरुवात झाली. चार बँकांच्या माध्यमातून डिजिटल चलन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात देशातील चार शहरातील State Bank Of India, ICICI Bank, Yes Bank आणि IDFC First Bank यांच्या माध्यमातून चलन बाजारात आणण्यात आले. त्याद्वारे ग्राहकांनी आभासी चलनातून व्यवहार पूर्ण केला.

बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा या बँकाही लवकरच या प्रकल्पात सहभागी होतील. दुसऱ्या पायलट टप्प्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदुर, कोच्ची, लखनऊ, पाटणा आणि शिमल्यात डिजिटल रुपयांचा डंका वाजेल.

हे सुद्धा वाचा

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) वास्तविक ब्लॉकचेन सहित अन्य तंत्रज्ञानावर (Blockchain Technology) आधारीत चलन आहे. होलसेल डिजिटल चलनाचा वापर काही संस्थांना करता येईल. तर किरकोळ चलनाचा वापर सर्वसामान्य नागरिकांना करता येणार आहे.

भारतीय करन्सीचे डिजिटल रुप E-Rupee ला बँकांच्या माध्यमातून वितरीत करता येईल. वापरकर्त्यांना बँकांकडून डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ई-चलनाचा वापर करता येईल. तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून या चलनाचा वापर करता येईल. खरेदी विक्री करता येईल.

आरबीआय डिजिटल रुपयाला नियंत्रीत करेल. तुम्हाला कोणत्याही दुकानातून किराणा, दाळी, दूध वा इतर वस्तू या अभासी चलनाच्या माध्यमातून खरेदी करता येईल. डिजिटल रुपयामुळे रोख चलन छापण्यासाठीचा मोठा खर्च वाचू शकेल. एका अंदाजानुसार, नोटा छपाईसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करावी लागते.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.