Fixed Deposit : SBI नंतर आता HDFCमध्येही फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी खूशखबर

Fixed Deposit in HDFC : एफडी व्याजदर दरात 10 बेसीस पॉईन्ट वाढवणून आता 4.9 वरुन पाच टक्के इतका इंटरेस्ट देण्याचं जाहीर केलंय. तर तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्यांना आता 5.45 टक्के इतका इंटरेस्ट मिळेल.

Fixed Deposit : SBI नंतर आता HDFCमध्येही फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी खूशखबर
HDFCनं जाहीर केले नवे दर नेमके काय? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 11:02 AM

मुंबई : फिक्स डिपॉझिट करण्याच्या इराद्यात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) आपल्या एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता एचडीएफसी बँकेत एफडी करणाऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकणार आहे. बँकेनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन याबाबतची माहिती जारी केली आहे. दोन कोटी पेक्षा कमी रक्कमेच्या एफडीवर 5 ते 10 पॉईन्ट्सने इंटरेस्ट रेट वाढवला आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहे. दरम्यान, याआधीच एसबीआय बँकेनंही अशाप्रकारने ग्राहकांना दिलासा दिला होता. एसबीआयनंही दो वर्षांपेक्षा जास्त वेळ एफडी करणाऱ्यांच्या बेसिक पॉईन्ट्समध्ये वाढ केली होती. 10-15 बेसिस पॉईन्ट्सची वाढ एसीबीआयकडून करण्यात आली होती. आरबीआयकडून रेपो रेट आणि इतर बाबी स्थिर ठेवण्यात आल्यामुळे एचडीएफसीनं आपल्या एफडीच्या इंटरेस्टमध्ये (Fixed Deposit Interest Rate) वाढ गेली आहे. फक्त एचडीएफसीच नव्हे तर इतरही अनेक बँकांनी आपल्या फिक्स डिपॉझिटमधील व्याजदरातही वाढ केली आहे.

नवे एफडी दर काय आहेत?

HDFC बँकेनं एक वर्षांच्या एफडी व्याजदर दरात 10 बेसीस पॉईन्ट वाढवणून आता 4.9 वरुन पाच टक्के इतका इंटरेस्ट देण्याचं जाहीर केलंय. तर तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्यांना आता 5.45 टक्के इतका इंटरेस्ट रेट मिळणार आहे. हे नवे दर 14 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत.

या आधी बँकेनं जानेवारीत दोन वर्षांपेक्षा जास्त ते तीन वर्षांपर्यंत एफडी करणाऱ्यांना 5.3 टक्के तर 3 वर्षांपेक्षा जास्त ते 5 वर्षांपेक्षा जास्त एफडी करणाऱ्यांना 5.4 टक्के तर पाच वर्षांपेक्षा जास्त ते 10 वर्षांपर्यंत एफडी करणाऱ्यांना 5.6 टक्के व्याजदर देण्याचं जाहीर केलं होतं.

एफडी करणाऱ्यांना खूशखबर

आरबीआयनं 10 फेब्रुवारीला आपले रेपो आणि रिव्हर्स रेपो दर न बदलण्याचं जाहीर केलं. या घोषणेनंतर अनेक बँकांनी ग्रहाकंना दिलासा देण्यासाठी आपल्या एफडी व्याजदरात बदलाव केले होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यूको बँकनं 10 फेब्रुवारी 2022पासून 2 कोटीपेक्षा कमी रक्कम असलेल्यांना दिलासा देत व्याजदरात वाढ केली होती.

एसबीआयमध्ये किती व्याज मिळणार?

2 कोटीपर्यंत रिटेल टर्म डिपॉझिट 2 वर्ष+ ते 3 वर्ष केल्यास 5.30 टक्के व्याजदर मिळेल. हा व्याजदर याआधी 5.10 टक्के इतकाच होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. तर 3+ वर्ष ते 5 वर्ष डिपॉझिट केल्यास 5.45 टक्के व्याजदर मिळेल. तर दुसरीकडे 5+ वर्ष ते 10 वर्ष डिपॉझिट केल्यास 5.50 टक्के व्याजदर मिळेल.

संबंधित बातम्या :

पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवा पैसे बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा

टॅक्स सेव्हिंग एफडी बँकेत करावी लागणार, जास्तीत जास्त व्याज कुठे?

खासगी किंवा सरकारी, आपल्या गुंतवणुकीवर कोणती बँक देते सर्वाधिक परतावा?

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.