Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fixed Deposit : नवीन वर्षात करा सुरक्षित गुंतवणूक, या 5 बँकाकडून FD वर सर्वाधिक व्याज

ही एक ट्रेडिशनल सेव्हिंग योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे लावण्यासाठी नेहमी तयार असतात. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटवर सरकारी गॅरंटी मिळते.

Fixed Deposit : नवीन वर्षात करा सुरक्षित गुंतवणूक, या 5 बँकाकडून FD वर सर्वाधिक व्याज
कारण, अवघ्या 20 रुपयांच्या बचतीवर तुम्ही लाखोंनी कमवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुम्हाला बचतीची सवय होईल आणि काही वर्षानंतर चागले पैसेही मिळतील. जाणून घेऊयात काय आहे योजना.
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 5:43 PM

नवी दिल्ली : गुंतवणुकीचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit). ही एक ट्रेडिशनल सेव्हिंग योजना (Traditional Savings Scheme) आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे लावण्यासाठी नेहमी तयार असतात. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटवर सरकारी गॅरंटी मिळते. FD वर व्याज (Fixed deposit Interest rates) वार्षिक आधारे द्यावं लागतं. पण व्याजदराची मोजणी (How to calculate FD interest rate)तिमाही आधारवर केली जाते. (fixed deposit rates these 5 banks are giving best returns on fd)

बचत खात्याच्या तुलनेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांना जास्तीचं व्याजही मिळतं. बँकांच्या मते FD चे दर हे नेहमी बदलत असतात. सगळ्यात विशेष म्हणजे FD (Fixed deposits) वर ज्येष्ठांना सगळ्यात जास्त व्याज मिळतं. सामान्य जनतेच्या तुलनेत ज्येष्ठांना 0.5 टक्के अतिरिक्त व्याज मिळतं. यामुळे जाणून घेऊयात कोणती बँक FD वर किती टक्के व्याज देते?

SBI मधील FD वर व्याज

* 7-45 दिवस – 2.90 टक्के व्याज

* 46-179 दिवस – 3.90 टक्के व्याज

* 180 दिवस – 1 वर्ष – 4.40 टक्के व्याज

* 1-2 वर्ष – 4.90 टक्के व्याज

* 2-3 वर्ष – 5.10 टक्के व्याज

* 3-5 वर्ष – 5.30 टक्के व्याज

* 5-10 वर्ष – 5.40 टक्के व्याज

SBI ज्येष्ठांना 0.5 टक्क्यांनी अतिरिक्त व्याज देते. तर ज्येष्ठांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत 6.2 टक्क्यांनी व्याज मिळतं.

Punjab National Bank मध्ये FD चे दर

* 7-45 दिवस – 3.00 टक्के व्याज

* 1 वर्षांहून कमी – 4.50 टक्के व्याज

* 1-3 वर्ष – 5.20 टक्के व्याज

* 5-10 वर्ष – 5.25 टक्के व्याज

HDFC बँकेत FD वरील व्याज

* 7-29 दिवस – 2.50 टक्के व्याज

* 30-90 दिवस – 3.00 टक्के व्याज

* 91 दिवस-6 महिने – 3.50 टक्के व्याज

* 1 वर्ष ते 2 वर्ष – 4.90 टक्के व्याज

* 2 ते 3 वर्ष – 5.15 टक्के व्याज

* 3-5 वर्ष – 5.30 टक्के व्याज

* 5 ते 10 वर्ष – 5.50 टक्के व्याज

Bank Of Baroda मध्ये FD वर व्याज

* 7 ते 45 दिवस – 2.80 टक्के व्याज

* 46-180 दिवस – 3.70 टक्के व्याज

* 181-270 दिवस – 4.30 टक्के व्याज

* 271 दिवस – 1 वर्षाहून कमी – 4.40 टक्के व्याज

* 1 वर्षाच्या मॅच्योरिटीवर – 5.0 टक्के व्याज

* 1 वर्षापासून ते 2 वर्षापर्यंत – 5.0 टक्के व्याज

* 2 ते 3 वर्ष – 5.10 टक्के व्याज

* 3 ते 10 वर्ष – 5.25 टक्के व्याज

Canara बँकेत FD वरील व्याज

* 7-45 दिवस – 2.95 टक्के व्याज

* 46-90 दिवस – 3.90 टक्के व्याज

* 180 दिवस ते 1 वर्षाहून कमी – 4.45 टक्के व्याज

* 1 वर्षाच्या मॅच्योरिटीवर – 5.25 टक्के व्याज

* 1 ते 2 वर्षाहून कमी – 5.20 टक्के व्याज

* 2-3 वर्षाहून कमी – 5.40 टक्के व्याज

* 3-10 वर्ष – 5.50 टक्के व्याज (fixed deposit rates these 5 banks are giving best returns on fd)

संबंधित बातम्या –

210 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 60 हजार, कोरोना काळात 15 लाख लोकांनी सुरू केली ‘ही’ सरकारी योजना

Loan Process | कर्ज घ्यायचा विचार करताय? मग ‘या’ 3 गोष्टींकडे लक्ष द्या…

(fixed deposit rates these 5 banks are giving best returns on fd)