Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Good News! लॉकडाऊनमध्ये नाही मिळाले रद्द केलेल्या फ्लाइटचे पैसे? आता ‘या’ तारखेपर्यंत येतील खात्यात

लॉकडाऊन दरम्यान मागील उन्हाळ्यात रद्द झालेल्या घरगुती उड्डाणांचा अद्याप परतावा न मिळालेल्या प्रवाशांकडून पुढील आठवड्यात ते मिळणे अपेक्षित आहे.

Good News! लॉकडाऊनमध्ये नाही मिळाले रद्द केलेल्या फ्लाइटचे पैसे? आता 'या' तारखेपर्यंत येतील खात्यात
Air travel will become more expensive from 1 April 2021
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 9:12 AM

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे (Lockdown) रद्द झालेल्या फ्लाइटच्या तिकीटाचे पैसे परत न मिळाल्यास अस्वस्थ होऊ नका. पुढच्या आठवड्यात, फ्लाइट तिकीटाचे पैसे तुमच्या खात्यावर परत केले जातील. लॉकडाऊन दरम्यान मागील उन्हाळ्यात रद्द झालेल्या घरगुती उड्डाणांचा अद्याप परतावा न मिळालेल्या प्रवाशांकडून पुढील आठवड्यात ते मिळणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी 25 मार्च रोजी देशभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर विमानाचे कामकाज थांबवण्यात आले होते. 25 मेपासून देशभरात देशांतर्गत उड्डाणे सुरू झाली. परंतु असे बरेच प्रवासी आहेत ज्यांचे तिकीट लॉकडाऊन दरम्यान परत मिळाले नाही. (flight ticket refund deadline for airfare refunds ends next week)

ही बातमी 25 मार्च ते 25 मेपर्यंत रद्द झालेल्या सर्व फ्लाईट्स संबंधी आहे. या दरम्यान रद्द झालेल्या सर्व विमान तिकीटांचे पैसे आता ग्राहकांच्या खात्यामध्ये परत करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटात असलेल्या विमान कंपन्या 2021 पर्यंत सर्व पैसे परत करणार आहे. जर मार्चच्या अखेरपर्यंत पैसे परत नाही आले तर तुम्ही संबंधित कंपनीशी संपर्क साधू शकता.

आंतरराष्ट्रीय बुकिंगसाठी एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल एजंटमार्फत कोर्टाच्या ऑक्टोबरच्या आदेशानंतर 15 दिवसांच्या आत ही रक्कम प्रवाशाला द्यावी लागेल. यामुळे तुम्हीही जर फ्लाईट बूक केल्या होत्या आणि त्याचे तुम्हाला पैसे परत आले नसतील तर तुम्ही महिन्याअखेरीस कंपनीस संपर्क साधू शकता. (flight ticket refund deadline for airfare refunds ends next week)

संबंधित बातम्या – 

Bank Holidays List : 3 दिवसांमध्ये करा बँकेची काम, पुढचे 10 दिवस बँकांना सुट्टी

Petrol Diesel Price Today : तब्बल 24 दिवसांनी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे ताजे दर

ATM ट्रान्झॅक्शन फेल झालं तर किती रुपये दंड बसतो? वाचा तुमच्या बँकेचे नियम

(flight ticket refund deadline for airfare refunds ends next week)

थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.