Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; आता मागवता येणार ऑनलाइन औषधे
जगातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टने आरोग्य क्षेत्रात देखील एन्ट्री केली आहे. आपल्याला आता फ्लिपकार्टवरून ऑनलाईन औषधे मागवता येणार आहेत.
नवी दिल्ली – जगातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टने आरोग्य क्षेत्रात देखील एन्ट्री केली आहे. आपल्याला आता फ्लिपकार्टवरून ऑनलाईन औषधे मागवता येणार आहेत. यासाठी कंपनीच्या वतीने आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट हेल्थ प्लस नावाची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी फ्लिपकार्टने कोलकाता स्थित सस्तासुंदर या कंपनीसोबत करार केला आहे.
सस्तासुंदरच्या बहुमत भागभांडवलाची खरेदी
या कराराबाबत माहिती देताना फ्लिपकार्टच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही आता आमच्या ग्राहकांना ऑनलाईन औषधी आणि आरोग्याशी संबंधित इतर गोष्टी खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. फ्लिपकार्ट हेल्थ प्लस अतंर्गत ग्राहकांना फ्लिपकार्टवरून औषधे खरेदी करता येतील. यासाठी आम्ही कोलकाता स्थित सस्तासुंदर या कंपनीशी करार केला आहे. या करारातंर्गत फ्लिपकार्ट सस्तासुंदरचे बहुमत भागभांडवल खरेदी करणार आहे. या करारावर दोनही कंपनीच्या वतीने स्वाक्षरी करण्यात आली आहे.
490 प्रकारच्या औषधींचा पुरवठा
दरम्यान सस्तासुंदर ही एक ऑनलाईन औषधी आणि आरोग्य सुविधा पुरवणारी कंपनी असून, वर्तमान काळात कंपनी आपल्या ग्राहकांना तब्बल 490 प्रकारच्या औषधी पुरवते. ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध व्हावीत हे कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कंपनीच्या सीईओंनी सांगितले.
संबंधित बातम्या
हवाई वाहतूक कोरोनापूर्व स्थितीमध्ये; प्रवाशांच्या संख्येत 71 टक्क्यांची वाढ
आता ईपीएफमध्ये नॉमिनी बदलणे झाले सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया