कोणताही फोन खरेदी करा आणि मिळवा 100 टक्के कॅशबॅक, Flipkart ची जबरदस्त ऑफर

फ्लिपकार्टने या खास ऑफरला अ‍ॅपद्वारे जाहीर केलं आहे. खरंतर ही एक स्पर्धा आहे. ज्यामध्ये एकूण 100 विजेत्यांना निवडलं जाईल.

कोणताही फोन खरेदी करा आणि मिळवा 100 टक्के कॅशबॅक, Flipkart ची जबरदस्त ऑफर
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 10:11 PM

मुंबई : दिवाळी सेलसोबतच ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी अनेक धमाकेदार ऑफर्स आणल्या आहेत. कंपनी आता ग्राहकांसाठी ‘Phone For Free’ ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये कोणताही फोन विकत घेतल्यानंतर 100 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. नेमकी काय आहे ही ऑफर जाणून घेऊयात. (flipkart phone for free offer buy any phone and get 100 money back)

काय आहे ‘Phone For Free’ ऑफर फ्लिपकार्टने या खास ऑफरला अ‍ॅपद्वारे जाहीर केलं आहे. खरंतर ही एक स्पर्धा आहे. ज्यामध्ये एकूण 100 विजेत्यांना निवडलं जाईल. या सगळ्यांना मोफत मोबाइल फोन दिला जाईल आणि फोनची किंमत कॅशबॅकच्या स्वरुपात परत केली जाईल. लकी ड्रॉ मार्फत या स्पर्धेमध्ये ग्राहकांना मोफत मोबाइल जिंकण्याची संधी मिळणार आहे.

असा घेऊ शकता स्पर्धेमध्ये भाग फ्लिपकार्ट Phone For Free स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला दुपारी 12 ते रात्री 12 च्या दरम्यान फोन ऑर्डर करावा लागेल. यानंतर फ्लिपकार्ट 100 लकी विजेत्यांची निवड करणार, ज्यांना मोबाइल फोनवर 100 टक्के कॅशबॅक मिळेल. म्हणजेच, नवीन फोनच्या बदल्यात त्यांना पैसे द्यावे लागणार नाहीत आणि त्यांना मोफत फोन मिळेल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही स्मार्टफोनला ऑर्डर करू शकता.

या दिवशी होणार विजेत्यांच्या नावाची घोषणा कंपनी या स्पर्धेत विजेत्यांची नावं 10 डिसेंबर 2020 रोजी घोषित करणार आहे. याशिवाय, या स्पर्धेमध्ये त्याच विजेत्यांचं नाव असेल ज्यांना फोन घरी डिलिव्हर झाला आहे. म्हणजेच फोन ऑर्डर करून तो कॅन्सल करणाऱ्या ग्राहकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

दरम्यान, या ऑफरशिवाय फ्लिपकार्टने बिग दिवाळी सेलचेही सुरू केलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्मार्टफोनबरोबरच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, मोबाईल अ‍ॅक्सेसरीज, होम अप्लायन्सेस, ड्रेस इत्यादींवरही मोठी सूट मिळणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी कोणत्याही कार्डद्वारे खरेदीवर 5% कॅशबॅक मिळणार आहे आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे शॉपिंगवर 10% इन्स्टंट कॅशबॅकही देण्यात येत आहे.

इतर बातम्या – 

ICICI बँकेच्या नफ्यामध्ये मोठी वाढ, कोरोनाच्या संकटातही 6 पटीनं झाला फायदा

हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी फाडली 2 मीटर लांब पावती, दंडाची रक्कम पाहून हादराल

(flipkart phone for free offer buy any phone and get 100 money back)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.