व्होडाफोन, केर्न एनर्जी कंपन्यांना मोठा दिलासा, निर्मला सीतारामन म्हणाल्या…
Vodafone Idea | काही दिवसांपूर्वीच कुमारमंगलम बिर्ला Vodafone Idea च्या नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदावरून पायउतार झाले होते. त्यामुळे ही कंपनी बंद पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. कुमारमंगलम बिर्ला यांच्या पत्रातील उल्लेखानुसार Vodafone-Idea लिमिटेड कंपनी डबघाईला आली आहे.
नवी दिल्ली: पूर्वलक्ष्यी कराच्या बोझ्यामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने नुकतेच संसदेत यासंदर्भातील विधेयक मंजूर करवून घेतले होते. त्यामुळे पूर्वलक्ष्यी पद्धतीने कर आणि भांडवल वृद्धी कर आकारण्याचा नियम संपुष्टात आला होता. त्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पूर्वलक्ष्यी प्रभावाने होणार कर आकारणी थांबवण्यासाठी लवकरच नियमावली जारी केली जाईल, असे आश्वासन दिले.
काही दिवसांपूर्वीच कुमारमंगलम बिर्ला Vodafone Idea च्या नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदावरून पायउतार झाले होते. त्यामुळे ही कंपनी बंद पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. कुमारमंगलम बिर्ला यांच्या पत्रातील उल्लेखानुसार Vodafone-Idea लिमिटेड कंपनी डबघाईला आली आहे. आता कंपनीचा गाडा हाकणे अवघड असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला Vodafone-Idea लिमिटेडकडे 27 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळेच या कंपनीची सूत्रे सरकार किंवा अन्य कोणाकडे सोपवून कारभार सुरु ठेवण्याचा विचार कुमार मंगलम बिर्ला यांनी बोलून दाखवला होता.
Vodafone Idea युजर्सना दिलासा?
व्होडाफोन आयडियाचे सीईओ रविंदर टक्कर यांनी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. Vodafone Idea कडून ग्राहकांना उत्तम सेवा आणि चांगले पर्याय देणे सुरुच राहील. गेल्या वर्षभरात ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले. आगामी काळात Vodafone Idea डिजिटल इंडियन आणि डिजिटल भारत या अभियानाच्यादृष्टीने सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आणि सेवा पुरवण्याचा प्रयत्न करेल, असे रविंदर टक्कर यांनी म्हटले. यावेळी रविंदर टक्कर यांनी कुमारमंगलम बिर्ला यांचा राजीनामा किंवा कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल भाष्य केले नाही. मात्र, त्यांच्या एकंदर प्रतिपादनाचा सूर आश्वासक दिसला.
व्होडाफोन आयडिया बुडाली तर सरकारलाही 1.6 लाख कोटींचं नुकसान?
आर्थिक संकटाला तोंड देणारी व्होडाफोन-आयडिया ही दूरसंचार कंपनी बुडल्यास केवळ बँका आणि ग्राहकच नव्हे तर सरकारलाही लाखो कोटींचे नुकसान सहन करावे लागू शकते. स्पेक्ट्रम पेमेंट्स आणि सुमारे 1.6 लाख कोटी रुपयांच्या एजीआर रकमेसह व्होडाफोन-आयडियाचं प्रचंड नुकसान आणि कर्ज झाल्यास सरकारला सर्वात मोठा तोटा ठरू शकते.
व्होडाफोन आयडिया बुडाल्यास दूरसंचार विभाग आणि सरकारचे मोठे नुकसान होईल. अनिल अंबानींचे रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एअरसेल कोसळल्यानंतर खराब पुनर्प्राप्ती आणि अवास्तव थकबाकी पाहता हे चित्र भीषण दिसते, जिथे हजारो कोटी रुपये देखील अडकलेले आहेत.
संबंधित बातम्या:
व्होडाफोन-आयडिया बंद झाल्यास 28 कोटी ग्राहकांचे काय?; ‘या’ 8 मोठ्या बँका होणार प्रभावित
व्होडाफोन आयडिया बुडाली तर सरकारलाही 1.6 लाख कोटींचं नुकसान, जाणून घ्या कसं?