देशी की विदेशी? परदेशी ब्रँडच्या दारूच्या किंमतीत थेट 36 टक्क्यांनी घट, सरकारची कृपा

मद्यप्रेमीसाठी दिलासादायक बातमी आहे. आता दारू स्वस्त झाली आहे. राज्य सरकारने आयात होणाऱ्या दारूवरील उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. उत्पादन शुल्क कपात करण्यात आल्याने अनेक विदेशी दारू ब्रँन्डच्या किमती या कमी झाल्या आहेत.

देशी की विदेशी? परदेशी ब्रँडच्या दारूच्या किंमतीत थेट 36 टक्क्यांनी घट, सरकारची कृपा
उल्हासनगरचा 'चांदनी डान्सबार' अखेर सील
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 9:26 AM

मुंबई : मद्यप्रेमीसाठी दिलासादायक बातमी आहे. आता दारू स्वस्त झाली आहे. राज्य सरकारने आयात होणाऱ्या दारूवरील उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. उत्पादन शुल्क कपात करण्यात आल्याने अनेक विदेशी दारू ब्रँन्डच्या किमती या कमी झाल्या आहेत. दारूवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. याचाच अर्थ मद्य आयातीवर पूर्वी 300 टक्के शुल्क आकारण्यात येत होते. आता हे शुल्क 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आयातीवर आता 150 टक्केच शुल्क आकारण्यात येणार आहे. परिणामी अनेक विदेशी मद्याच्या किमतींमध्ये सरासरी 30 ते 35 टक्के घट झाली आहे.

किमतीमध्ये 30 ते 35 टक्क्यांची घट

नवीन दरानुसार जॉनी वॉकर, ब्लॅक लेबल या विदेशी मद्याच्या 750 एमएल बाटलीची किंमत 3750 रुपये एवढी झाली आहे. ती पूर्वी 5750 एवढी होती. याचाच अर्थ किमतीमध्ये सरासरी 35 टक्क्यांची कपात झाली आहे. ब्लॅक लेबस प्रमाणेच रेड लेबलच्या किमतीमध्ये 36 टक्के तर इत आणखी काही ब्रॅन्डच्या किमतीमध्ये 30 ते 31 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे. दारू स्वस्त झाल्याने मद्यप्रेमींना मोठा दिसाला मिळाला आहे.

महसूल वाढणार

आयात केलेल्या दारूमधून सरकारला दरवर्षी सुमारे 100 कोटींपेक्षाही अधिक महसूल मिळतो. मात्र आता उत्पादन शुल्क घटवण्यात आल्याने दारूचे दर स्वस्त झाले आहेत. यातून दारू विक्री वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यात दारूची विक्री अडीच पटीने वाढण्याचा अंदाज असून, त्यातून सरकारचा महसूल 250 कोटींपर्यंत पोहचू शकतो. शुल्कात कपात केल्याने इतर राज्यातून होणाऱ्या स्कॉचच्या तस्करीला देखील आळा बसेल. दारूची तस्करी कमी झाल्यास महसुलामध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

आधारच्या मदतीने रोखता येणार कर चोरी; ‘एनपीसीआय’चा दावा

Gold Rate Today: सोने खरेदी झालं स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पटापट तपासा

जुने ATM कार्ड कालबाह्य होऊनही नवे कार्ड घरी पोहोचले नाही, मग करायचे काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.