चार महिन्यानंतर सोन्याचे दर पुन्हा नवीन विक्रमाकडे, दहा दिवसांत 3,000 रुपयांनी वधारले

येत्या आठवड्यात सोन्याचे दर स्थिर राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. जळगावच्या सराफ बाजारात 48 तासांत सोन्याचे दर 2 हजार 700 तर चांदीचे दर 3 हजर 700 रुपयांनी वाढले आहेत. चांदी जीएसटीसह 95 हजार 275 प्रति किलो तर सोने 82 हजार 812 रुपयांवर पोहोचले आहे.

चार महिन्यानंतर सोन्याचे दर पुन्हा नवीन विक्रमाकडे, दहा दिवसांत 3,000 रुपयांनी वधारले
जळगाव येथील सराफा बाजारात सोने आणि चांदीचा महागाईचा पतंग आकाशी गेला आहे. मकर संक्रांतीला मौल्यवान धातुची खरेदी महागली आहे. ग्राहकांच्या खिशावर संक्रांत आली आहे.
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 2:35 PM

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा नवीन विक्रमाकडे जाणार आहे. सलग तीन दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सोने शनिवारी पुन्हा 700 रुपयांनी महाग झाले. तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत 1,420 रुपयांची वाढ दहा ग्रॅममागे झाली आहे. सलग सहा दिवसांचा विचार केल्यावर ही दरवाढ 1600 रुपये आहे. गेल्या दहा दिवसांत सोने 3,000 रुपयांनी वधारले आहे. त्यामुळे सोन्याचे दर जळगावच्या सराफ बाजारात 80 हजार रुपयांच्या वर गेले आहेत. जीएसटीसह सोन्याचे दर प्रतितोळा 82 हजार 812 रुपयांवर पोहोचले आहे.

का वाढल्या किंमती?

शुक्रवारी सोन्याच्या दरात जळगावातील सरफा बाजारात पुन्हा 700 रुपयांनी वाढ झाली. आगामी लग्नसराईमुळे सोन्यास मागणी वाढली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात तेजी आली आली आहे. त्याचा परिणाम सोने महाग होण्याकडे होत आहे. आता सोने महाग होऊन सोन्याचे दर 80 हजार 400 रुपये एवढे झाले आहेत. चार महिन्यांनंतर सोन्याचे दर 80 हजारांवर आले आहे.

येत्या आठवड्यात सोन्याचे दर स्थिर राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. जळगावच्या सराफ बाजारात 48 तासांत सोन्याचे दर 2 हजार 700 तर चांदीचे दर 3 हजर 700 रुपयांनी वाढले आहेत. चांदी जीएसटीसह 95 हजार 275 प्रति किलो तर सोने 82 हजार 812 रुपयांवर पोहोचले आहे.

दिल्लीत सोने 82,400 रुपयांवर

गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहे. लग्नसराईसाठी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला वाढलेल्या दरामुळे नक्कीच कात्री बसणार आहे. दिल्लीत सोने 82,400 रुपये प्रती 10 ग्रॅमसाठी पोहचले आहे. मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात सोन्याने उच्चांक निर्माण केला होता. त्यानंतर सोन्याचे दर कमी झाले होते. परंतु सोने पुन्हा नवीन उच्चांकावर पोहचणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....