FPI: भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला; शेअर बाजारात 13,269 कोटींची गुंतवणूक

FPI | परकीय गुंतवणुकदारांनी 1 जून ते 30 जून या काळात शेअर बाजारातून 17,215 आणि बाँड मार्केटमधून जवळपास 3,946 कोटी रुपये काढून घेतले होते. यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात परकीय गुंतवणुकदारांनी शेअर बाजारातून अनुक्रमे 9,435 कोटी आणि 2,666 कोटी रुपये काढून घेतले होते.

FPI: भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला; शेअर बाजारात 13,269 कोटींची गुंतवणूक
परकीय गुंतवणूक
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 7:41 AM

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल अडखळत सुरु आहे. भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे मध्यंतरीच्या काळात परदेशी गुंतवणुकदार जपून गुंतवणूक करताना दिसत होते. सलग दोन महिने परकीय गुंतवणुकदारांनी  आपले पैसे बाजारातून काढून घेण्याचा सपाटा लावला होता. मात्र, त्यानंतही शेअर बाजाराची (Share Market) घोडदौड सुरुच राहिली होती. त्यामुळे परकीय गुंतवणुकदार पुन्हा भारताकडे वळले आहेत. गेल्या काही दिवसांत परकीय गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात 13,269 कोटींची गुंतवणूक केली आहे. हा ट्रेंड आगामी काळात कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

दोन महिन्यांत पैसे काढले

डिपॉझिटरीच्या माहितीनुसार, परकीय गुंतवणुकदारांनी 1 जून ते 30 जून या काळात शेअर बाजारातून 17,215 आणि बाँड मार्केटमधून जवळपास 3,946 कोटी रुपये काढून घेतले होते. यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात परकीय गुंतवणुकदारांनी शेअर बाजारातून अनुक्रमे 9,435 कोटी आणि 2,666 कोटी रुपये काढून घेतले होते.

कोणत्या क्षेत्रांमध्ये जास्त गुंतवणूक?

जून महिन्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर परकीय गुंतवणुकदारांनी तंत्रज्ञान आणि विमा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये पैसे गुंतवले आहेत.

‘या’ देशांमध्येही परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला

भारतीय भांडवली बाजारासह तैवान, दक्षिण कोरिया आणि फिलीपाईन्स या आशियाई देशांमध्येही परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था आगामी काळात मोठी झेप घेऊ शकतात. त्यामुळे परकीय गुंतवणुकदारांनी या देशांवर लक्ष केंद्रित केले आहे.

संबंधित बातम्या:

एसबीआयच्या या योजनेसह मिळवा नियमित उत्पन्न, नाही बिघडणार घराचे बजेट

Mutual Fund : दररोज 500 रुपये बचत करा आणि मिळवा करोडोंचा फंड, अशी करा गुंतवणूक

बँकेला ATM साठी जागा भाड्याने द्या; घरबसल्या चांगली कमाई करा

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.