Share Market : गुंतवणूकदार हवालदिल, शेअर बाजाराला कशामुळे घसरणीला, वेगात असलेल्या गाडीला कोणी लावला ब्रेक?

Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदार पुन्हा कशामुळे हवालदिल झाले आहेत, काय आहेत यामागची कारणे..

Share Market : गुंतवणूकदार हवालदिल, शेअर बाजाराला कशामुळे घसरणीला, वेगात असलेल्या गाडीला कोणी लावला ब्रेक?
घसरणीचे कारण कायImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 4:57 PM

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) सध्या घसरणीला लागला आहे. एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांचे (Investors) प्रचंड नुकसान झाले होते. जुलै महिन्यापर्यंत बाजारात गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) भारतीय बाजाराकडे पाठ करुन उभे ठाकले आहे. त्यांनी गुंतवणुकीचा ओघ आटवल्याने बाजारात तेजीच्या सत्राला उतरण लागली आहे.

सप्टेंबर महिन्यात या परदेशी पाहुण्यांनी केवळ 8,600 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर गेल्या महिन्यात त्यांनी भारतीय शेअर बाजारात 51,000 कोटींची गुंतवणूक केली होती. बाजारातून परदेशी पाहुण्यांचे हे पलायन अनेक कारणांमुळे होत आहे. पण त्याचा फटका भारतीय बाजाराला बसत आहे. बाजारातील घसरणीचा भारतीय शेअरधारकांना आणि नवख्या गुंतवणूकदारांना फटका बसत आहे.

अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली वाढ, मंदीची आशंका, रुपयाची घसरण, रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव यामुळे परदेशी गुंतवणूकदार प्रभावीत झाले आहेत. त्यांनी गुंतवणूक करताना हात आखडता घेतला आहे. जुलै महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर ऑगस्ट महिन्यात त्यांनी 51,200 रुपयांची गुंतवणूक केली होती.

हे सुद्धा वाचा

1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात अस्थिरता असताना ही 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावेळी बाजार ही मजबूत स्थिती पोहचला. पण त्यानंतर अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवला. बाजारात पुन्हा मंदीची आशंका वाढली. या धाकधुकीमुळे परदेशी पाहुण्यांनी भारतीय बाजारात गुंतवणूक कमी केली.

जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय बाजारात उत्साह परतला होता. पण त्यानंतर मंदीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतवणे कमी केले आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सारखे कोसळत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.