भारताचं नंदनवन गॅस नेटवर्कनं जोडणार, मुंबई ते काश्मीर पाईपलाईन; केंद्राचं पाऊल

गेलचे अध्यक्ष आणि प्रमुख व्यवस्थापक मनोज जैन (Manoj Jain) यांनी काश्मीरपर्यंत नैसर्गिक वायू वहनाची योजना जाहीर केली आहे. नैसर्गिक वायूंच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे.

भारताचं नंदनवन गॅस नेटवर्कनं जोडणार, मुंबई ते काश्मीर पाईपलाईन; केंद्राचं पाऊल
GAIL (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:50 PM

नवी दिल्ली : भारताच्या दोन्ही टोकांना रस्त्याच्या जाळ्यांनी जोडण्याचं काम वेगानं सुरू आहे. आता रस्ते, रेल्वेसोबत नैसर्गिक वायू पुरवठा विस्ताराची योजना केंद्र सरकारनं आखली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या गेल (इंडिया) लिमिटेडने (GAIL– Gas Authority of India Limited) महत्वाची घोषणा केली आहे. गेलचे अध्यक्ष आणि प्रमुख व्यवस्थापक मनोज जैन (Manoj Jain) यांनी काश्मीरपर्यंत नैसर्गिक वायू वहनाची योजना जाहीर केली आहे. नैसर्गिक वायूंच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून मे 2023 पर्यंत मुंबई ते नागपूर 700 किलोमीटर पाईपलाईन विस्ताराचे उद्दिष्ट असल्याचे गेलनं म्हटलं आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभरात (Central India) गॅसचा पुरवठा केला जाणार आहे.

भारतभर पाईपलाईचं जाळ :

भारताची उर्जा आवश्यकता दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे पर्यायी इंधन साधनांच्या उपलब्धतेकडं सरकारचा कल आहे. नैसर्गिक वायूच्या वापराला केंद्रानं अग्रक्रम दिला आहे. वर्ष 2030 पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर 6.7 टक्क्यांनी वाढून 15 टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. मनोज जैन यांनी पीटीआय-भाषाला दिलेल्या मुलाखतीत योजनेचे स्वरुप स्पष्ट केलं आहे. 425 किलोमीटर लांबीची गुरुदासपूर (पंजाब राज्य) ते श्रीनगर (जम्मू) पर्यंत पाईपलाईन विस्तारासाठी (पीएनजीआरबी) कडून मंजूरी मिळविण्याच्या प्रक्रियेत असल्याचं जैन यांनी सांगितलं.

मुंबई ते रायपूर :

भारतातील दुर्गम भागात जाळ विस्तारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. आगामी 3-4 वर्षात योजना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. नैसर्गिक वायूला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांकडे कर कपातीची मागणी केली आहे. सध्या मुंबई ते झारसुगुडा (ओडिशा) मार्ग नागपुर आणि छत्तीसगडच्या रायपुर पर्यंत 1,405 किलोमीटर पाईपलाईन टाकत आहे. नागपूर पर्यंतचे काम मे 2023 सुरू होईल आणि उर्वरित काम दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

नैसर्गिक वायू म्हणजे काय?

जमिनीतून मिळणाऱ्या खनिज वायूला नैसर्गिक वायू असे म्हणतात. हा अत्यंत ज्वलनशील असतो. याचा इंधन म्हणून वापर केला जातो. नैसर्गिक वायूमध्ये 90-95 % मिथेन असते व 5 ते 10 टक्के इतर वायू असतात. नैसर्गिक वायू हे एक मिश्रण आहे. नैसर्गिक वायूचा मिथेन हा मुख्य घटक आहे. नैसर्गिक वायू अनेकदा खनिजतेलासह एकत्रितपणे जमिनीत आढळतो.

इतर बातम्या :

GOLD PRICE TODAY: मुंबईत सोन्याच्या भावात घसरण; पुणे, नाशकात स्थिर; जाणून घ्या आजचे भाव

मुलाच्या नावे मुदत ठेव केल्यास मिळणा-या व्याजावर कोणाला भरावा लागेल कर ? जाणून घ्या नियम

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.