Cylinders : गॅस सिलेंडरवर QR Code, काय होईल साध्य नि कसे करेल काम? फायद्याचे गणित काय..

Cylinders : गॅस सिलेंडरवरील QR Code लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..

Cylinders : गॅस सिलेंडरवर QR Code, काय होईल साध्य नि कसे करेल काम? फायद्याचे गणित काय..
चोरीला बसेल आळाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 6:31 PM

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरबाबत (Gas Cylinder) केंद्र सरकारने एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराला आळा घालणे सोपे होणार आहे. सिलेंडरची चोरी यामुळे रोखता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) रामबाण उपाय शोधला आहे. त्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरवर QR Code लावण्यात येणार आहे.

लवकरच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसवर (LPG) क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. हा QR Code, Smartphone च्या सहाय्याने स्कॅन करुन त्यासंबंधीची माहिती मिळविता येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी याविषयीची घोषणा केली.

हा कोड सिलेंडरवर आधार कार्डसारखे काम करेल. सध्या तुम्हाला मिळणाऱ्या सिलेंडरवर क्यूआर कोड लावण्यात येईल. तर नवीन ग्राहकांना क्युआर कोडसहितच गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्यांदा एकूण 20,000 एलपीजी गॅस सिलेंडरवर हा कोड लावण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यात सगळ्याच 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरवर क्युआर कोड लावण्यात येणार आहे.

या क्युआर कोडमुळे ग्राहकांना, सिलेंडर डिस्ट्रीब्युटरचे नाव, तुमच्या घरी ते कोठून येणार आहे. डिलिव्हरी बॉयचे नाव काय आहे, याची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. या क्युआर कोडमुळे गॅस सिलेंडरचा पूर्ण प्रवास तुम्हाला पाहता येईल.

क्यू आर कोडमुळे गॅस सिलेंडर सध्या कुठे आहे त्याची माहिती मिळेल. ग्राहकांना गॅस सिलेंडरचे वजन, त्याची एक्सपायरी डेटची माहिती मिळेल. गॅस लिकेजची माहिती मिळविता येईल. गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट केलेली आहे की नाही याची माहिती घेता येईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.