Gautam Adani : अदानी समूहावर पुन्हा आरोपांचा तोफगोळा! सर्वच शेअरची दाणादाण

Gautam Adani : अदानी समूहाच्या मानगुटीवर हिंडनबर्गचे भूत अजूनही कायम आहे. आता हिंडनबर्गनंतर अजून एका अहवालाने गुंतवणूकदारांचा भरवसा डळमळीत झाला आहे. अदानी समूहाने OCCRP च्या या अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे. हा अहवाल बोगस असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पण तोपर्यंत या तीन तासांत कंपनीचे इतक्या हजार कोटी स्वाहा झाले.

Gautam Adani : अदानी समूहावर पुन्हा आरोपांचा तोफगोळा! सर्वच शेअरची दाणादाण
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 2:00 PM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : अदानी समूहाच्या (Adani Group) मानगुटीवर आता आणखी एक अहवाल बसला आहे. हिंडनबर्ग अहवालाने तर अगोदरच पिच्छा पुरवला आहे. या नव्या रिपोर्टने पण अदानी समूहावर काही सवाल उठवले आहेत. त्याचा फटका कंपनीला शेअर बाजारात बसला. अवघ्या 3 तासांत अदानी समूहाच्या सर्वच शेअरमध्ये (Share) आपटी बार सुरु झाला. गुंतवणूकदारांचा पुन्हा अदानी समूहावरील विश्वास डळमळीत झाला. त्यात समूहाचे मोठे नुकसान झाले. ईडीने याप्रकरणात प्राथमिक तपास पूर्ण केला. त्यात शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून काही जणांना मोठा फायदा झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. आता जगातील दिग्गज गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या ऑर्गेनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) अदानी समूहावर गंभीर आरोप लावले आहेत. फर्मच्या दाव्यानुसार, अदानी कुटुंबियांच्या भागीदारांनी शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी ‘ऑफ शोर’ म्हणजे Opaque फंडचा वापर केला.

अदानी समूहाचा नकार

OCCRP च्या अहवालात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यात अदानी समूहाच्या काही उद्योगांच्या शेअरमध्ये मॉरीशस फंडच्या माध्यमातून “अपारदर्शक” पद्धतीने लाखो डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. यामध्ये अदानी कुटुंबाच्या कथित बिझनेस पार्टनर्सचा किती वाटा आहे, हे समोर आले नाही. या अहवालावर अदानी समूहाची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी हा अहवाल बोगस असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

3 तासांत 35000 कोटींचा फटका

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने लावलेल्या आरोपाने शेअर बाजारात भूकंप आला. अदानी समूहाच्या सर्वच शेअरमध्ये मोठी घसरण झाली. अदानी समूहाच्या प्रतिक्रिया आल्यावर ही घसरण थांबली नाही. सर्वच शेअर लाल निशाणीवर व्यापार करत होती. अदानी समूहाच्या सर्वच शेअरमध्ये पडझड सुरु झाली. समूहाला 3 तासांत 35000 कोटींचा फटका बसला.

या शेअरमध्ये घसरण

अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिकची घसरण आली. तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर 3.3 टक्क्यांनी घसरले. अदानी इंटरप्राईजेसच्या शेअरची किंमत 2.50 टक्के घसरण आहे. तर अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर 2.25 टक्क्यांनी खाली आला. अदानी समूहातील सर्वच 10 सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरमध्ये पडझड झाली. या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 35624 कोटी रुपयांची घसरण दिसून आली. बुधवारी या कंपन्यांचे मार्केट कॅप 10,84,668.73 कोटी होते. ते घसरुन 10,49,044.72 कोटी रुपयांवर आले.

ही तर हिंडनबर्गचे कॉपी-पेस्ट

ईटीनुसार, OCCRP ने गंभीर आरोप लावल्यानंतर अदानी समूहाने त्यावर स्पष्टीकरण दिले. हिंडनबर्ग अहवालात जे आरोप लावण्यात आले, तेच OCCRP ने कॉपी-पेस्ट केल्याचे त्यांनी सांगितले. हा अहवाल पूर्णपणे निराधार, खोटा असल्याचे समूहाचे म्हणणे आहे. हिंडनबर्गने जे आरोप केले, तेच आरोप सध्या करण्यात येत असल्याचे अदानी समूहाचे म्हणणे आहे.

अदानी समूहाविरोधात आरोपांची राळ

हिंडनबर्गनंतर आता OCCRP ने अदानी समूहाविरोधात आघाडी उघडली आहे. हिंडनबर्ग प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. त्यातही अदानी समूहाच्या अडचणी वाढविणारा प्राथमिक अहवाल समोर येत आहे. तर नवीन अहवालात पण अदानी समूहाविरोधात आरोपांची राळ उठवण्यात आली आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.