Gautam Adani : काळाचा महिमा कुणाला कळला, ज्या महाविद्यालयात नाही मिळाली ॲडमिशन; आता तिथेच गौतम अदानी यांनी केलं मार्गदर्शन

Gautam Adani Lecture : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या आयुष्यातील एक आगळीवेगळी घटना घडली. यंदाचा शिक्षक दिन त्यांच्या खास स्मरणात राहिला. कारण ज्या शाळेने त्यांना प्रवेश दिला नव्हता. त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाची ही मोठी पावती म्हणावी लागेल.

Gautam Adani : काळाचा महिमा कुणाला कळला, ज्या महाविद्यालयात नाही मिळाली ॲडमिशन; आता तिथेच गौतम अदानी यांनी केलं मार्गदर्शन
गौतम अदानी यांच्या यशाची पावती
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 11:17 AM

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या आयुष्यातील यंदाचा शिक्षक दिन उत्साहाचा ठरला. हा शिक्षक दिन त्यांच्यासाठी एकदम खास होता. ते हा दिवस कधीच विसरु शकणार नाहीत. ज्या महाविद्यालयात त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा होती, तिथेत त्यावेळी त्यांना प्रवेश मिळाला नाही. आज त्याच ठिकाणी त्यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. गौतम अदानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाची ही मोठी पावती म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

गौतम अदानी यांनी 1970 मध्ये या महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज दाखल केला होता. पण त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यांनी पुढे शिक्षणाला रामराम ठोकला आणि ते व्यापारात घुसले. गेल्या साडेचार दशकात त्यांनी पाहता पाहता 220 अब्ज डॉलरचे साम्राज्य उभारले. आज त्याच महाविद्यालयात त्यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवण्यात आले.

जय हिंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विक्रम नानकानी यांनी त्यांचा यावेळी विद्यार्थ्यांना ओळख करुन दिली. ते 16 वर्षांचे असतानाच मुंबईत आले होते. याठिकाणी हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम ते करु लागले. त्यांनी वर्ष 1977 वा 1978 मध्ये जय हिंद महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज दाखल केला होता. पण त्यावेळी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी अगोदरच या महाविद्यालयात शिकत होते.

हे सुद्धा वाचा

या महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले नसले तरी ते जय हिंदचे माजी विद्यार्थीच असल्याचा गौरव ननकानी यांनी केला. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने महाविद्यालयाने त्यांना त्यावेळी प्रवेस दिला नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः कामाला सुरूवात केली. त्यांनी त्यांचा पर्याय निवडला. त्यांनी जवळपास दोन वर्षे हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम केले. त्यानंतर ते पॅकेजिंगचा कारखाना सुरू करण्यासाठी गुजरातला परतले. हा कारखाना त्यांचे भाऊ चालवत असल्याची माहिती ननकानी यांनी दिली.

मागे वळून पाहिले नाही

गौतम अदानी यांनी 1998 मध्ये व्यापाराला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी परत मागे वळून पाहिले नाही. पुढील दीड वर्षात त्यांच्या कंपन्यांनी बंदरे, खाण, खनिजकर्म, वीज, गॅस, नवीन ऊर्जा, सिमेंट, रिअल इस्टेट, डेटा सेंटर आणि मीडिया सारख्या क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल टाकले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.