हिंडनबर्गच्या धक्क्याने अदानी श्रीमंताच्या यादीत तिसऱ्यावरुन सातव्या स्थानावर

गेल्या ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर त्यांची पत्ती आली आहे. यामुळे जगतिक श्रीमंतांच्या क्रमवारीत गौतम अदानी यांचे स्थान घसरुन ७ व्या स्थानावर आले आहे.

हिंडनबर्गच्या धक्क्याने अदानी श्रीमंताच्या यादीत तिसऱ्यावरुन सातव्या स्थानावर
नवीन क्षेत्रात अदानींचा दबदबाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 4:44 PM

नवी दिल्ली : अमेरिकेतील नावाजलेली गुंतवणूक संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg) एका अहवालाने भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी भूकंप आणला. या भूकंपाचा सर्वाधिक फटका आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांना बसला. एका दिवसांत त्यांची संपत्ती १.४४ लाख कोटीने कमी झाली. (Gautam Adani Networth)

एका अहवालामुळे गौतम अदानी (Adani Enterprises) यांच्या कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. तसेच त्यांची स्वतःची संपत्तीही कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरात अदानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्याचा परिणाम त्याच्या संपत्तीवर झाला आहे.

गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग दिवशी गौतम अदानी यांची संपत्ती $121 अब्ज होती. त्यात तब्बल $28.3 अब्जने घट झाली. आता गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $100 अब्ज डॉलरच्या खाली आली आहे. गेल्या ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर त्यांची पत्ती आली आहे. यामुळे जगतिक श्रीमंतांच्या क्रमवारीत त्यांचे स्थान घसरुन ७ व्या स्थानावर आले आहे.

हे सुद्धा वाचा

पाच दिवसांत मोठे नुकसान

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गेल्या पाच दिवसांत गौतम अदानी यांचे एकूण रु. 2.30 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $121 अब्ज होती, जी आता घसरून $92.7 अब्ज झाली आहे.

म्हणजेच या काळात त्यांच्या संपत्तीत 28.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.30 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. गौतम अदानी यांची संपत्ती 5 जुलै रोजी 100 अब्ज डॉलरच्या खाली होती. त्यानंतर शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची संपत्ती कमी झाली.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय घट झाल्यानंतर ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत खूप खाली आले आहेत. काही दिवसांपूर्वी ते जागतिक क्रमवारीत 3 व्या क्रमांकावर होते. आता 7 व्या स्थानावर आहे. सध्या, पहिल्या स्थानावर फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट आहे, त्यांची एकूण संपत्ती $190 अब्ज आहे. त्यानंतर इलॉन मस्क, जेफ बेझोस, बिल गेट्स, वॉरेन बफे, लॅरी एलिसन आहेत. भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे $81.52 अब्ज संपत्तीसह जगातील 13 व्या सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.