दुसऱ्या क्रमांकावरील उद्योजक अदानींची पहिल्या क्रमांकासाठी मोठी घोषणा, नवा प्लॅन काय?
पोर्ट आणि एअरपोर्ट व्यवसायानंतर आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदानी यांनी नवी घोषणा केलीय.
मुंबई : पोर्ट आणि एअरपोर्ट व्यवसायानंतर आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदानी यांनी नवी घोषणा केलीय. अदानी आता सिमेंट उद्योगात उतरणार आहेत. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार Adani Enterprises एक सब्सिडिअरी कंपनी सुरू करणार आहे. या कंपनीचं नाव Adani Cement असं असेल. यासाठी ऑथराईज्ड शेअर कॅपिटल 10 लाख रुपये आणि पेड-अप कॅपिटल 5 लाख रुपये असेल (Gautam Adani planning to start cement company very soon) .
Adani Cement चं मुख्यालय गुजरातमध्ये असणार आहे. भविष्यात सिमेंट क्षेत्रातील वाढ आणि नफा लक्षात घेऊन अदानींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. देशाची अर्थव्यवस्था कोरोनातून सावरल्यावर सिमेंट क्षेत्रात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मॉर्गन स्टॅनलीचे व्यवस्थापकीय संचालक रिद्धम देसाई यांनीही आगामी काळात सिमेंट क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
उद्योगपतींची सिमेंट उद्योगाला पसंती का?
देसाई म्हणाले, “सिमेंट क्षेत्र आतापर्यंत पूर्णपणे डोमेस्टिक आहे. सध्या या क्षेत्रातील धोरणांविषयी देखील काही आव्हान नाही. सिमेंट उद्योग पूर्णपणे देशांतर्गत मागणीवर अवलंबून आहे. आगामी 2 वर्षात सिमेंट क्षेत्रात मोठी वाढ होईल. या क्षेत्रातील कंपन्यांचं अस्तित्व मर्यादित आहे. अशा स्थितीत मागणी वाढली की त्याच्या किमतीचा फायदा होईल.” दुसरीकडे गौतम अदानी सारख्या उद्योजकाने या क्षेत्रात प्रवेश केल्यानं पायाभूत सविधा क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार झालंय.
अदानी अंबानींपेक्षा एकच पाऊल मागे
गौतम अदानी सध्या देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 77 अब्ज डॉलर आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत आतापर्यंत 43.20 अब्ज डॉलरची वाढ झालीय. जगात श्रीमंतीचा विचार करता ते 14 व्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी 84.3 अब्ज डॉलर संपत्तीसह भारतात पहिल्या क्रमांकावर तर जगात 12 व्या क्रमांकावर आहेत. अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 7.62 अब्ज डॉलरची वाढ पाहायला मिळाली आहे.
6 कंपन्या लिस्टेड
सद्यस्थितीत अदानी समुहाच्या 6 कंपन्या लिस्टेड आहेत. अदानी समुहाच्या या 6 कंपन्यांची टोटल मार्केट कॅप नुकतीच 100 बिलियन डॉलर पेक्षा अधिक झालीय. अदानी एंटरप्राइजेज, अदानी पोर्ट अँड SEZ, अदानी ट्रान्समिशन, अदानी पावर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी अशी या सहा कंपन्यांची नावं आहेत.
हेही वाचा :
मुकेश अंबानी, रतन टाटांसोबत 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये गौतम अदानींची एन्ट्री, रचला इतिहास
गौतम अदानींच्या कंपनीला केंद्र सरकारचं मोठ्ठं कंत्राट; श्रीमंतांच्या यादीत जेफ बेझोसच्या पत्नीलाही टाकले मागे
आधी वीज बिल माफ करु म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर नाही म्हणाले : राज ठाकरे
व्हिडीओ पाहा :
Gautam Adani planning to start cement company very soon