हिंडनबर्गचे शटर डाउन डाऊन, रॉकेट बनले अदानींचे शेयर, बाजारात जोरदार तेजी
Stock Market: अदानी ग्रुपसंदर्भात हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणावर घसरले. त्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांनी भरपाई केली होती. हिंडनबर्ग फर्मचे संस्थापक नॅट एंडरसन यांनी फर्म बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
Stock Market: सन 2023 मध्ये भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरसंदर्भात नकारात्मक अहवाल हिंडनबर्ग या संस्थेने दिला होता. अमेरिकेतील ही रिसर्च फर्म आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअरने जोरदार उसळी घेतली. अदानी यांच्या नऊ शेअरमध्ये वाढ झाली. किमतीमध्ये सुमारे नऊ टक्के वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 318.74 वाढ झाली. 2023 मध्ये हिंडनबर्ग या संस्थेने अदानी यांच्या कंपन्यांचा नकारात्मक अहवाल दिल्यानंतर त्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. सुमारे 100 अब्ज डॉलरचे नुकसान त्यांच्या कंपन्यांचे झाले होते. अदानी ग्रुपने हिंडनबर्ग यांचे आरोप फेटाळले होते.
अदानी ग्रुपसंदर्भात हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणावर घसरले. त्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांनी भरपाई केली होती. हिंडनबर्ग फर्मचे संस्थापक नॅट एंडरसन यांनी फर्म बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
का केली हिंडनबर्ग बंद?
एंडरसन यांनी हिंडनबर्ग बंद करण्याचे कारण दिले आहे. आपले उद्दिष्ट साधले गेले आहे. त्यामुळे आपण ही फर्म बंद करत आहोत. हिंडनबर्ग बंद करण्याचे नियोजन खूप आधीपासून करण्यात आले होते. त्यानुसार आम्हाला पोंजी स्कीमचा तपास पूर्ण करायचा होता.
एंडरसन यांनी हिंडनबर्ग यांनी कंपनीच्या सुरवातीसंदर्भात सांगितले की, हिंडनबर्ग सुरु केली तेव्हा पैसा आणि सुविधा दोघांचा मोठा अभाव होता. हिंडनबर्गने वेळोवेळी अनेक संकटांचा सामना केला. हिंडनबर्ग सुरु झाली त्यावेळी आमच्यावर तीन खटले दाखल झाले. त्यामुळे आमच्याकडे असणारा सर्व पैसाही संपला होता. त्यावेळी लॉयर ब्रायन वुड यांनी मोठी मदत केली.
हिंडनबर्गची टीम आता काय करणार?
हिंडनबर्ग बंद झाल्यानंतर आता त्या कंपनीतील सदस्य काय करणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. हिंडनबर्गच्या टीममध्ये 11 सदस्य होते. ते वित्तीय संशोधन संस्था उघडण्याचा विचार करत आहेत. समारोप भाषणात एंडरसन यांनी त्यांची पत्नी, परिवार, मित्र आणि वाचकांना धन्यवाद दिले आहेत.