Adani Group: अदानी यांची एक चाल अन् एका झटक्यात मिळाले 1450 कोटी रुपये

Adani Power Payment:अदानी पॉवरकडून बांगलादेशला लागणाऱ्या वीज पुरवठ्यापैकी 10% वीज पुरवठा केला जातो. त्यासाठी बांगलादेश पॉवर बोर्डासोबत 25 वर्षांसाठी करार 2015 मध्ये करण्यात आला. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान अदानी पॉवरची 400 मिलियन डॉलर बांगलादेश पॉवर बोर्डाकडे थकले आहे.

Adani Group: अदानी यांची एक चाल अन् एका झटक्यात मिळाले 1450 कोटी रुपये
उद्योगपती गौतम अदानी
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 2:09 PM

Adani Power Payment: बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर त्या देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. बांगलादेशातील हिंसाचारामुळे अनेक कंपन्या दुसऱ्या देशांकडे वळल्या आहेत. त्यानंतर बांगलादेशवर कर्जाचा ढोंगर वाढत आहे. बांगलादेश पॉवर बोर्डवर अदानी पॉवरची 7000 कोटींची थकबाकी झाली होती. यासंदर्भात अदानी पॉवर झारखंड लिमिटेडने अनेक स्मरणपत्र बांगलादेश पॉवर बोर्डाला दिले. त्यानंतरही थकबाकी मिळाली नाही. यामुळे गौतम अदानी यांच्या अदानी पॉवर कंपनीने बांगलादेशला दिला जाणारा वीजपुरवठ्यात कपात करत निम्मा केला. त्यानंतर बांगलादेशात वीज संकट निर्माण झाले. यामुळे बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकार खळबळून जागे झाले. त्यांनी तातडीने अदानी पॉवरच्या खात्यात 1,450 कोटी रुपयांचे नवीन लेटर ऑफ क्रेडिट (LC) दिले.

अदानी पॉवर झारखंडमधील गोदा कोळसा प्लॅन्टमधून बांगलादेशला 1,600 मेगावॉट विजेचा पुरवठा करते. परंतु थकबाकी झाल्यामुळे हा वीज पुरवठा कमी करण्यात आला. अदानी पॉवरने बांगलादेश पॉवर बोर्डाकडून अजून 15-20 मिलियन डॉलरच्या पेमेंटची मागणी केली आहे. अन्यथा 800 मेगावॉटचे एक युन‍िट बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

2015 मध्ये 25 वर्षांसाठी करार

अदानी पॉवरकडून बांगलादेशला लागणाऱ्या वीज पुरवठ्यापैकी 10% वीज पुरवठा केला जातो. त्यासाठी बांगलादेश पॉवर बोर्डासोबत 25 वर्षांसाठी करार 2015 मध्ये करण्यात आला. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान अदानी पॉवरची 400 मिलियन डॉलर बांगलादेश पॉवर बोर्डाकडे थकले आहे. परंतु त्यातील अर्धीच रक्कम मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

5500 कोटी रुपये येणे बाकी

अदानी पॉवरकडून बांगलादेशला देण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यापैकी 95-97 मिलियन डॉलर (जवळपास 800 कोटी रुपये) दर महिन्याला मिळतात. परंतु ऑगस्ट महिन्यात शेख हसीना सरकार गेल्यानंतर बांगलादेशचे परकीय चलन भंडार कमी झाले. त्यामुळे बांगलादेशला तेल आणि वीज पुरवठ्यासाठी पैसे मिळवणे कठीण झाले. त्यामुळे अदानी पॉवरने बांगलादेशचे उर्जा सचिवांना पत्र लिहिले. त्यात बांगलादेश पॉवर बोर्डाकडे असलेली थकबाकी देण्याचे म्हटले आहे. त्यानंतर वीज पुरवठा कमी करण्यात आला. त्यामुळे 1450 कोटी रुपये मिळाले. परंतु अजूनही 5500 कोटी रुपये येणे बाकी आहे.

Non Stop LIVE Update
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.
भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'
भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'.
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा.
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली.
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं.
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?.