अदानी समूह देणार रिलायन्सला टक्कर, मुंबईत रिलायन्सपेक्षाही मोठे…17 हजार कोटींची गुंतवणूक
Gautam Adani Mukesh Ambani: कन्वेंशन सेंटर कोणत्याही मोठ्या शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालतात. कन्वेंशन सेंटरमध्ये परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली जातात. ज्याद्वारे व्यापार आणि निर्यातीला प्रोत्साहन दिले जाते. आता रिलायन्सनंतर अदानी समूह यामध्ये येत आहे.
Gautam Adani Mukesh Ambani: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. मुकेश अंबानी यांनी मुंबईत रिलायन्सचे जिओ वर्ल्ड सेंटर उभारले आहे. त्यांच्यापेक्षा मोठे आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर उभारण्याची तयारी गौतम अदानी करत आहेत. त्यासाठी 17000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गेल्या काही वर्षांत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाप्रमाणे गौतम अदानी यांचा अदानी समूहाच्या उद्योगाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गौतम अदानी यांनी त्यांच्या उद्योगाचा विस्तार अनेक क्षेत्रांमध्ये केला आहे.
कन्वेंशन सेंटरची ब्लूप्रिंट दोन महिन्यांत
मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कन्वेंशन सेंटर बनवण्याचा निर्णय अदानी समुहाने घेतला गेला आहे. त्या प्रकल्पाची विस्तृत ब्लूप्रिंट पुढील दोन महिन्यांत मिळणार आहे. या कन्वेशन सेंटरमध्ये 275 खोल्या असणाऱ्या फाइव-स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. हे कन्वेंशन सेंटर विले पारले वेस्टर्न सबर्बच्या जवळ तयार करण्यात येणार आहे.
15000 ते 20000 लोक बसणार
अदानी समुहाचे कन्वेंशन सेंटर 1.5 मिलियन वर्ग फुटमध्ये तयार करण्यात येणार आहे. त्यात 15000 ते 20000 हजार लोकांच्या बसण्याची सुविधा असणार आहे. जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर 1 मिलियन वर्ग फुटात तयार करण्यात आले आहे. अदानी यांच्या कन्वेंशन सेंटरमध्ये 1.2 मिलियन वर्ग फुटाचा इंडोर एरिया असणार आहे. त्यात 0.3 मिलियन वर्ग फुटात गाड्यांची पार्किंग असणार आहे. अदानी समूहाच्या रिअल एस्टेट प्रोजेक्ट्सचे अधिकार अदानी रियाल्टीकडे आहे. तसेच या कन्वेंशन सेंटरचा मालकी हक्क अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सकडे असणार आहे. देशातील एकूण 11 विमानतळाचे संचालन अदानी समूह करते.
कन्वेंशन सेंटरमुळे काय फायदा
कन्वेंशन सेंटर कोणत्याही मोठ्या शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालतात. कन्वेंशन सेंटरमध्ये परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली जातात. ज्याद्वारे व्यापार आणि निर्यातीला प्रोत्साहन दिले जाते. या केंद्रांमध्ये स्थानिक आणि जागतिक दोन्ही ठिकाणचे उद्योजक एकत्र येतात.