Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani : गौतम अदानी यांचा मास्टरस्ट्रोक! अंबानी यांच्या साम्राज्यात घुसखोरी, ही कंपनी करणार खरेदी

Gautam Adani : गौतम अदानी यांचा अदानी समूह आता पुन्हा उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहेत. हा समूह आता थेट अंबानी यांच्या साम्राज्यात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी टेकओव्हर करण्यासाठी अदानी समूह प्रयत्न करत आहे.

Gautam Adani : गौतम अदानी यांचा मास्टरस्ट्रोक! अंबानी यांच्या साम्राज्यात घुसखोरी, ही कंपनी करणार खरेदी
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 8:37 AM

नवी दिल्ली : गौतम अदानी (Gautam Adani) आणि अदानी समूह पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत आहे. काही कंपन्यांमधील शेअर्सची विक्री करुन, तर काही प्लँट विकून अदानी समूहाने कर्ज परतफेड केली आहे. तर उर्वरीत रक्कमेतून ऊर्जा क्षेत्रात पुन्हा मांड ठोकण्याचा प्रयत्न हा समूह करत आहे. निधी गोळा करण्यापासून ते अनेक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याची योजना अंमलात येत आहे. आता अदानी समूहाने थेट अंबानी यांच्या साम्राज्यात (Ambani Empire) घुसखोरी करणार आहे. विदर्भातील एक कंपनी खरेदी करण्यासाठी अदानी समूहाने कंबर कसली आहे. ऊर्जा क्षेत्रात दबदबा तयार करण्यासाठी अदानी समूहाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी अनेक योजना तयार आहेत. त्यातच गौतम अदानी यांनी हा मास्टरस्ट्रोक लगावला आहे.

ही कंपनी करणार खरेदी अनिल अंबानी यांनी स्वतःला दिवाळखोर घोषीत केले आहे. 2008 मध्ये जगातील श्रीमंतात ते 6 व्या क्रमांकावर होते. पण काही निर्णयाचा फटका त्यांना बसला. आज त्यांच्यावर दिवाळखोरीची वेळ येऊन ठेपली आहे. गौतम अदानी हे अनिल अंबानी यांच्या कोळशापासून वीज निर्मिती करणारा पॉवर प्लँट खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. कोर्टाकडून सध्या त्याचा लिलाव सुरु असून अदानी समूहाची हा प्लँट खरेदी करण्याची योजना आहे.

विदर्भाशी कनेक्शन कोळशापासून वीज निर्मितीची हा प्रकल्प अर्थातच विदर्भात आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड असे त्याचे नाव आहे. ही कंपनी मध्य भारतात 600 मेगावॅट वीज निर्मिती करते. हा प्लँट ताब्यात घेण्यासाठी गौतम अदानी हे निधी जमवत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

पण स्पर्धा तीव्र त्यासाठी 2.8 अब्ज डॉलर निधी जमावण्याची तयारी करण्यात येत आहे. अर्थात त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागू शकते. इतर पण अनेक समूह हा प्लँट खरेदीसाठी इच्छुक असल्याचे समोर येत आहे.

हे दोन तगडे प्रतिस्पर्धी हा प्लँट हाती घेण्यासाठी रिलायन्स पॉवर लिमिटेडने पण कंबर कसली आहे. त्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. अदानी आणि रिलायन्स पॉवर लिमिटेड यांनी अजून ही औपचारिकरित्या कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. या व्यवसारावर टिप्पणी करण्यास रिलायन्सने नकार दिला. तर अदानी समूहाने पण कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही.

पोर्टफोलिओत वृद्धी हा पॉवर प्लँट खरेदी केला तर अदानी समूहाचा पोर्टफोलिओ वाढेल. मध्य भारतातील मोठा प्लँट त्यांच्या हाती येईल. या प्लँटमधून ऊर्जा निर्मितीचे लक्ष ते गाठू शकतील. या खरेदीमुळे गुंतवणूकदारांचा पण फायदा होऊ शकतो. हिंडनबर्गच्या हल्लाबोलनंतर अदानी समूह गर्भगळीत झाला होता. त्यांना मोठा फटका बसला होता.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.