Anand Mahindra | जगातील पहिली फोल्डेबल ई-बाईक! आनंद महिंद्रा यांचे काय आहे कनेक्शन

Anand Mahindra | सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचा मोठा फॅन फोलअर्स आहे. त्यांच्यासाठी ते सातत्याने नवीन काहीतरी माहिती देतात. एखादी हटके माहिती शेअर करत असतात. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर एका फोल्डेबल ई-बाईकचा फोटो टाकला आहे, त्यावर चर्चा झडत आहे, कशी आहे ही ई सायकल..

Anand Mahindra | जगातील पहिली फोल्डेबल ई-बाईक! आनंद महिंद्रा यांचे काय आहे कनेक्शन
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 2:33 PM

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कॅनडाप्रकरणात भारतीयांची मनं जिंकली होती. कॅनडा खलिस्तानी दहशतवादाच्या हत्येप्रकरणात भारताला गोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा निषेध म्हणून त्यांनी तडकाफडकी तिथल्या उपकंपनीचे कामकाज थांबवले. त्यात त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. देशातील लाखो तरुण त्यांना समाज माध्यमावर फॉलो करतात. मायक्रो ब्लागिंग प्लॅटफॉर्म एक्सवर(पूर्वीचे ट्विटर) त्यांनी एका फोल्डेबल ई-बाईकचे फोटो अपलोड केले आहेत. जगातील पहिल्या फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-बाईकची फोटो पाहून अनेकांचे कुतूहल जागे झाले आहे.

कोणती आहे ई-बाईक

हे सुद्धा वाचा

आनंद महिंद्रा यांनी या ई-बाईकचे फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहे. त्यात एक सायकल दिसत असली तरी ती ई-बाईक आहे. हॉर्नबॅक (Hornback) असे या ई-बाईकचे नाव आहे. ती फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-बाईक आहे. त्यांच्या कारच्या डिक्कीतून फोल्ड केलेली ही ई-बाईक बाहेर काढताना ते दिसतात. त्यानंतर तिची जुळवाजुळव करतात. या ई-बाईकवर बसून ते रपेट मारताना दिसत आहेत.

कशी आहे ई-बाईक

आनंद महिंद्रा यांच्या दाव्यानुसार, इतर फोल्डेबल बाईकपेक्षा ती 35 टक्के अधिक कार्यक्षम आहे. ही ई-बाईक फोल्ड केल्यावर उचलावी लागत नाही. ही बाईक IIT Bombay च्या काही सदस्यांनी तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. या ई-बाईकच्या स्टार्टअपमध्ये महिंद्रा यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी याविषयीची माहिती शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.

ऑफिसभोवती रपेट

पोस्टनुसार, त्यांनी HORNBACK X1 ही स्वतःसाठी पण घेतली आहे. ते कार्यालयीन परिसरात या ई-बाईकवरुन छानपैकी रपेट मारुन येतात. ही ई-बाईक एमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ग्राहकांना खरेदी करता येऊ शकते. अर्थातच या पोस्टला इतर पोस्टप्रमाणेच चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. वजनाने हलकी आणि मजबूत असलेल्या या ई-बाईकच्या किंमतीविषयी युझर्समध्ये सर्वाधिक उत्सुकता दिसून आली. केंद्रीय शिक्षण मंत्री, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पण त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.