गौतम अदानी यांनी 24 तासांतच छापले पैसे, एलॉन मस्क याला पण टाकले मागे

Gautam Adani Networth | गेल्या एक आठवड्यापासून बडे उद्योजक गौतम अदानी यांच्यावर सर्वच ग्रह प्रसन्न झाले आहेत. त्यांना सर्वच बाजूंनी आनंदवार्ता येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 24 जानेवारी 2023 रोजीपासून त्यांच्यावर हे सर्व ग्रह रुसले होते. आता त्यांनी गेल्या आठवड्यापासून मोठी झेप घेतली आहे. आज तर नोटा छापण्यात त्यांनी विक्रम केला.

गौतम अदानी यांनी 24 तासांतच छापले पैसे, एलॉन मस्क याला पण टाकले मागे
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 3:49 PM

नवी दिल्ली | 6 डिसेंबर 2023 : दुख भरे दिन बीत रे भैया, अब सुख आयो रे, असे संगिताचे सूर अदानी कार्यालयातून ऐकू येत असतील तर नवल वाटू देऊ नका. कारण गेल्या आठवड्यापासून बडे उद्योजक गौतम अदानी यांनी धुवांधार बॅटिंग सुरु केली आहे. अदानी समूहावर नोटांचा पाऊस पडत आहे. गेल्या जवळपास एक वर्षांपासून त्यांच्या कंपन्यांवरील दुखाचे मळभ हटले आहे. नोटा छापण्यात तर त्यांनी आज मोठा विक्रम केला. जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क याला पण त्यांनी धोबी पछाड दिली. एकाच दिवसांत त्यांनी मोठी उडी घेतली. जागतिक अब्जाधीशांपेक्षा अधिक कमाई केली.

अदानी यांची गरुड भरारी

24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग अहवालानंतर या समूहाला मोठे हादरे बसले. हा समूह अजूनही त्यातून सावरलेला नाही. पण आता चोहो बाजूंनी आनंदवार्ता येत आहे. त्यामुळे गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत मोठी भरारी घेतली आहे. अदानी यांनी एकाच दिवसात 12.3 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1,91,62,33,500 रुपयांची कमाई केली आहे. अदानी यांनी एकाच दिवसाच अब्जावधींची कमाई केली.

हे सुद्धा वाचा

तीन दिग्गजांपेक्षा अधिक कमाई

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, सोमवारी गौतम अदानी यांनी एकाच दिवसात जवळपास 4 अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमाई केली. तर मंगळवारी केवळ 24 तासात झटपट 12.3 अब्ज डॉलरची कमाई केली. एकाच दिवसात अदानी यांच्या कमाईचा आकडा एलॉन मस्क, जेफ बेजोस आणि बर्नार्ड अर्नाल्ट या तीन दिग्गजांपेक्षा अधिक आहे. एकाच दिवसात एलॉन मस्क याने 2.25 अब्ज डॉलर, जेफ बेजोसने 1.94 अब्ज डॉलर तर बर्नार्ड अर्नाल्ट यांनी 2.16 अब्ज डॉलरची कमाई केली.

अदानी गॅसचा शेअर 18 टक्के पळाला

गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये जोरदार वाढ झाली. त्याच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीचे सत्र होते. गेल्या तीन दिवसांत Adani Group च्या 10 सूचीबद्ध कंपन्यांनी रॉकेट भरारी घेतली. बुधवारी या सर्व शेअर्सने मोठी झेप घेतली. दुपारी 2.10 वाजता अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये 18.66 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये 14.1 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अदानी विल्मर या शेअरमध्ये तेजीचे सत्र आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.