Gold Rate : सोने 45 वर्षांनंतर दराचा विक्रम मोडणार, यंदा 41 वेळा ऑल टाइम हाय, तेजी 34 टक्के, कुठपर्यंत वाढणार सोन्याचे दर
Gold Rate : एससीएक्सवर गुरुवारी डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोने 13 रुपयांच्या किंचित वाढीसह 78443.00 रुपयांवर बंद झाले. दिवाळीच्या एक दिवस आधी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली.
Gold Rate : सोन्याच्या दराने नवीन उच्चांक निर्माण केला आहे. यंदा सोन्याच्या दरात 34 टक्के तेजी आली आहे. 1995 नंतर सोन्याच्या किंमतीत सर्वाधिक तेजी आली आहे. या वर्षी सोने 41 वेळा ऑल टाइम हायवर पोहचले आहे. यापूर्वी 2011 मध्ये सोने 34 वेळा ऑल टाइम हायवर गेले होते. इतिहासात प्रथमच सोन्याची किंमत 2,800 डॉलर प्रती औंस झाली आहे. महागाईचा विचार केल्यास सोने 1970 नंतर सर्वोत्तम पातळीवर पोहचले आहे. तसेच 1979 नंतर सोन्याचे दर उच्चांक पातळीकडे जात आहे. 45 वर्षांपूर्वी सोने 120 टक्के वाढले होते.
का सोन्याच्या किंमती वाढल्या?
अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीत अनिश्चिता निर्माण झाली आहे. तसेच पश्चिम आशियामध्ये संकट आहे. युक्रेन-रशिया तणाव आणि इस्त्रायल-इराण ताणवाचा परिणामामुळे सोन्याचे दर वाढले आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अमेरिकेतील निवडणुकीनंतर सोन्याच्या दराची वाटचाल कशी राहणार? हे स्पष्ट होणार आहे. तसेच भारतात दिवाळी आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. भारतीय लोकांमध्ये सोने खरेदीची परंपरा जुन्या काळापासून आहे. त्यामुळे सण आणि लग्नसराईत सोन्याची मागणी वाढलेली असते.
सोन्याचे दर कुठपर्यंत जाणार?
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याचे दर मध्यम कालावधीसाठी प्रति 10 ग्रॅमसाठी 81,000 रुपये असणार आहे. दीर्घ कालावधीसाठी हे दर 86,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. कॉमेक्सवर सोने मध्यम अवधीसाठी 2,830 डॉलर आणि दीर्घ कालावधीसाठी 3,000 डॉलरवर पोहचणार आहे. सोने सध्याच्या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी करणारे एसेट्स बनले आहे. यंदा सोन्याच्या किंमती कॉमेक्स आणि घरगुती बाजारात विक्रमी पातळीवर पोहचल्या आहेत.
एससीएक्सवर गुरुवारी डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोने 13 रुपयांच्या किंचित वाढीसह 78443.00 रुपयांवर बंद झाले. दिवाळीच्या एक दिवस आधी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली. प्रथमच 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळीवर सोने पोहचले. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत 99.9 टक्के शुद्धतेचे सोने 1,000 रुपयांनी वाढून 82,400 रुपयांवर पोहोचले.