सोनं खरेदीच्या विचारात असाल, तर ही चांगली बातमी वाचा, सोन्याचा भाव किती कमी झाला ते जाणून घ्या…
कमोडिटी एक्सचेंजवर (MSX) जून वायदा सोन्याचा भाव 0.09 टक्के प्रति 10 ग्रामवर घसरला आहे. तर जुलै वायदा चांदीची किंमत 0.73 टक्क़े प्रतिकिलोग्राम इतकी खाली आली आहे. या वर्षी भारतात सोन्याच्या दरात हजार रुपयांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
जागतिक बाजारात आलेल्या मंदीमुळे मंगळवारी (31 मे) भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये (Gold silver prices)मोठी घसरण बघायला मिळाली. कमोडिटी एक्सचेंजवर (MSX) जून वायदा सोन्याचा भाव 0.09 टक्के प्रति 10 ग्रामवर घसरला आहे. तर जुलै वायदा चांदीची किंमत 0.73 टक्क़े प्रतिकिलोग्राम इतका खाली आली आहे. या वर्षी भारतात सोन्याच्या दरात हजार रुपयांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोन्यातील गुंतवणूकदारांना (Investors) खरेदीची मोठी संधी मिळणार आहे. स्पॉट गोल्ड 0.3 टक्के घसरुण 1,849.92 डॉलर प्रति औसवर आले आहे.
अमेरिकन डॉलरला मिळालेली मजबुती आणि युएस ट्रेझरी यील्डस्मध्ये झालेल्या वाढीमुळे मंगळवारी सोन्यावर दबाव वाढला. मासिक आधारावर जागतिक मार्केटमध्ये सोनं 2.4 टक्के घसरले आहे. सप्टेंबर 2021 नंतर ही सोन्यातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. स्पॉट सिल्वर मंगळवारी 0.6 टक्के घसरुण 21.82 डॉलर प्रति औस राहिली आहे. या महिन्यात हे 4.1 टक्के घसरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर जून वायदा सोन्याचा भाव 149 रुपये म्हणजेच 0.09 टक़्के घसरुण 51,050 रुपये प्रति दहा ग्रामवर राहिला तर, जुलै वायदा चांदीचा दर 452 रुपये म्हणजेच 0.73 टक्के घसरुन 61,430 रुपये प्रतिकिलोवर होता.
आज कोणत्या शहरात किती भाव
शहर 22 कॅरेट प्रति 10 ग्राम 24 कॅरेट प्रती 10 ग्राम
दिल्ली 47,750 रुपये 52,100 रुपये कोलकाता 47,750 रुपये 52,100 रुपये मुंबई 47,750 रुपये 52,100 रुपये चेन्नई 47,920 रुपये 52,260 रुपये बेंगलुरु 47,750 रुपये 52,100 रुपये हेदराबाद 47,750 रुपये 52,100 रुपये
आर्थिक संकटाचा परिणाम
आर्थिक संकटांच्या दरम्यान सोन्यातील गुंतवणूकीला एक सेफ मानले जात असते. हाई शॉट टर्म युएस इंट्रेस्ट रेट्स बुलियन ठेवण्याची संधी भांडवलाला वाढवत असते. तर दुसरीकडे काही वेळे आधी एक मजबूत डॉलर विदेशी खरेदीदारांसाठी एक ग्रीनबेक किमत असलेल्या बुलियनला अधिक महाग करीत असतो. या वर्षी मार्चमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होउन ते 55 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रामपर्यंत पोहचले होते. यानंतर युएस बॉन्ड यील्ड्सने उसळी आणि अमेरिकन डॉलरला मजबुती मिळाल्यानंतर गोल्ड मार्केटमधील संघर्ष सुरु झाला.
सोमवारी झाली मामुली वाढ
सोन्याच्या दरात सोमवारी काहीशी वाढ बघायला मिळाली होती. दिल्लीत 10 ग्राम सोन्याचा भाव 75 रुपयांनी वाढून तो 51,052 रुपयांपर्यंत पोहचला होता. तर चांदीमध्येही वाढ दिसून आली होती. प्रति किलो 120 रुपयांची वाढ मिळवून चांदीचा दर 62,143 रुपये प्रतिकिेलोवर पोहचला होता.