Today gold silver prices: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने स्वस्त, चांदी स्थिर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली असून, चांदीचे दर स्थिर आहेत. मुंबईत सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार 400 रुपये इतके आहेत.
मुंबई : अक्षय तृतीया (Akshay Tritiya) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. तीन मे रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त माणण्यात येते. या दिवशी सोन्याची (gold) खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याला मोठी मागणी असते. ग्राहक आपआपल्या सोईनुसार सोन्याची खरेदी करतात. कोणी प्रत्यक्ष सोन्याची खरेदी करते तर कोणी डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) गुंतवणूक करते. या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. काल सोन्याच्या दरात किंचित तेजी दिसून येत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48550 रुपये इतके होते तर आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार 400 रुपये असून, त्यात तोळ्यामागे दीडशे रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 800 रुपये इतके आहेत.
आजचे सोन्याचे दर
- सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात आज जाहीर झालेल्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 400 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजार 800 रुपये इतका आहे.
- गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 480 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजार 880 रुपये आहे.
- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 480 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 880 रुपये आहेत.
- औरंगाबादमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 48 हजार 500 रुपये व 52 हजार 850 रुपये इतका आहे.
- आज चांदीचा दर प्रति किलो 63 हजार 500 रुपये इतका आहे. आज चांदीचे दर स्थिर आहेत.