Gold Silver Price : सोन्याची पुन्हा भरारी, चांदी ही चमकली, आजचा भाव काय

Gold Silver Price : सोन्याच्या किंमती पुन्हा गगनाला भिडल्या. जानेवारी ते मार्च महिन्यात सोन्या-चांदीतील गुंतवणुकीने अनेकांना मालामाल केले. आजचा भाव घ्या जाणून.

Gold Silver Price : सोन्याची पुन्हा भरारी, चांदी ही चमकली, आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 9:20 AM

नवी दिल्ली : देशात गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदी महागाईवर (Gold Silver Price Update) स्वार झाले आहे. या दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीत सातत्याने वाढत आहेत. मध्यंतरी या भावात घसरण पण झाली. पण तेजीचे सत्र कायम राहिले. त्यात खंड पडला पण तो जास्त काळ टिकला नाही. सोन्याने सर्वात अगोदर 2 फेब्रुवारी रोजी विक्रम केला होता. त्यानंतर सोन्याने 19 मार्च रोजी 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. पुन्हा सोन्यात घसरण झाली. आता सोने पुन्हा 60,000 रुपयांच्या घरात गेले आहे. 2 फेब्रुवारी रोजी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा विक्रम तुटला नाही. पण चांदी 73,300 रुपयांच्या आतबाहेर आहे.

शनिवार-रविवार भाव नाही

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत. सोमवारी नवीन दर जाहीर करण्यात येतील. शुक्रवारी सराफा बाजारातील भाव अपडेट झाले. आयबीजीएने दर जाहीर केले. त्यानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,715 रुपये तर संध्याकाळी ही किंमत 59,751 रुपये होती. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 59,476 रुपये तर संध्याकाळी 59,512 रुपये होती. बुधवारी सोने 370 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढले. हा भाव 59335 रुपये प्रति तोळा होता. मंगळवारी सोने 58965 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोने सातत्याने रेकॉर्ड तयार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने लवकरच 61,000 रुपयांचा टप्पा गाठू शकते.

हे सुद्धा वाचा

गुडरिटर्न्सचा दावा काय

गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,150 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 60,150 रुपये होता. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,000 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,000 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,000 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,000 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,030 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,030 रुपये आहे.

गुंतवणूकदार मालामाल

सोन्याने भावात एक विक्रम केला होता. पण कमाई झाली ती चांदीमुळे. मार्च महिन्यातील 30 दिवसांत गुंतवणूकदारांना जास्तीतजास्त 12 टक्के परतावा दिला आहे. तर सोन्याने जवळपास 7 टक्के परतावा दिला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल आणि चीनमधील परिस्थिती सुधारत असल्याने चांदीची (Silver Return) मागणी वाढली आहे. यामुळे चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारही अचंबित झाले आहे.

हॉलमार्क क्रमांक अनिवार्य

ग्राहक मंत्रालयाने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.

भाव एका मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.