नवी दिल्लीः आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ झालीय. आजच्या वाढीसह सोन्याने 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला. सोमवारच्या व्यवहारात चांदीच्या दरात नरमाई दिसून आली. परदेशी बाजारातून मिळालेल्या संकेतांनंतर आज सोन्यामध्ये वाढ दिसून आली.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 58 रुपयांनी वाढून 47039 रुपयांवर पोहोचला. गेल्या ट्रेडिंग सत्रातही सोन्यामध्ये वाढ झाली होती आणि 36 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह तो 46981 च्या पातळीवर बंद झाला, म्हणजेच 2 दिवसांत सोने सुमारे 100 रुपयांनी महागले.
दुसरीकडे आज चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आणि चांदी 175 रुपये प्रति किलोने महागली आणि 60362 रुपयांची पातळी गाठली. सोमवारी चांदीचा भाव सुमारे 100 रुपयांनी घसरून 60187 रुपये प्रति किलो झाला होता. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या दरात ही वाढ विदेशी बाजारातून मिळालेल्या संकेतांमुळे झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1781 डॉलर प्रति औंस होता.
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्यापूर्वीचा शेवटचा आठवडा सोन्याच्या घसरणीचा आठवडा होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनुसार, 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान सोने प्रति 10 ग्रॅम 574 रुपयांनी आणि चांदी प्रति किलो 2200 रुपयांनी स्वस्त झाली. म्हणजेच दोन दिवसांच्या वाढीनंतरही सोने पुन्हा स्वस्त झाले. चांदी अजूनही 29 नोव्हेंबरच्या पातळीच्या खाली आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, कोविड ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची भीती वाढल्यास सोने-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. किंबहुना अर्थव्यवस्थेतील दबावाची चिन्हे पाहता गुंतवणूकदार अधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. गेल्या वर्षी कोविडमध्येही असेच दिसून आले होते, जेव्हा भौतिक सोन्याची मागणी नसतानाही गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचल्या होत्या.
संबंधित बातम्या
Paytm कडून विमानाच्या तिकिटावर 50 टक्क्यांपर्यंत सूट, फायदा कसा घ्याल?
घर नको पण अटी आवर; साधा पंखा असला तरी मिळणार नाही ‘पंतप्रधान आवास’चा लाभ