मुंबई, पुण्यासह राज्यातल्या चार मोठ्या शहरात सोन्याचे आजचे भाव काय? स्वस्त झालंय की वाढलंय? फटाफट तपासा
Gold price | 22 कॅरेट सोन्याचे भाव किंचितसे वधारलेत. 10 ग्रामसाठी मंगळवारी 46 हजार 200 रुपये मोजावे लागत होते तर आज त्याची किंमत 46 हजार 200 रुपये झालीय. चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत.
मुंबई: महाराष्ट्रात सोन्याच्या दरात चढ उतार पहायला मिळतायत. कालच्या आजच्या दरात काही शे रुपयांची उतार घसरण नोंदवली जातेय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर हे राज्यातले चार मोठे शहरं आहेत. तिथं असलेल्या सोन्या चांदीच्या भावाचा राज्यातल्या इतर शहरावर परिणाम दिसून येतो. त्यामुळेच राज्याच्या चार भागातल्या चार मोठ्या शहरात सोन्याचे (Gold rates) आजचे काय भाव आहेत ते पाहुण घेऊयात. यातही प्रत्येक शहरागणिक आणखी थोडासा फरक असू शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष सोने बाजारातली किंमत तपासून घ्या. (Gold and Silver rates in Maharashtra)
22 कॅरेट सोन्याचे भाव किंचितसे वधारलेत. 10 ग्रामसाठी मंगळवारी 46 हजार 200 रुपये मोजावे लागत होते तर आज त्याची किंमत 46 हजार 200 रुपये झालीय. चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत. प्रती किलो 67 हजार 900 रुपये असा चांदीचा भाव कायम आहे. सोन्याच्या किंमती देशात वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या आहेत. त्याला कारण एक्साईज ड्युटी तसच राज्य सरकारचे टॅक्सेस आहेत.
राजधानी नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 10 ग्रामसाठी 46 हजार 150 रुपये आहे तर चेन्नईत तो 44 हजार 450 रुपये इतका आहे. मुंबईत मात्र त्यासाठी 46 हजार 200 रुपयेच मोजावे लागतील. 24 कॅरेट सोन्यासाठी मात्र जास्त किंमत मोजावी लागेल. 10 ग्राम सोन्यासाठी 47 हजार 220 रुपये इतका भाव आहे. कालच्यापेक्षा ही किंमत 60 रुपयाने अधिक आहे. बुधवारी चांदीही 67 हजार 900 रुपये प्रती किलो एवढी होती.
मुंबईत कसंय सोनं?
24 कॅरेट सोन्याचा मुंबईतला कालचा भाव होता 47 हजार 200 रुपये तर तो आज 46 हजार 900 रुपये आहे.
पुण्यात सोन्याचं काय झालंय?
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 45 हजार 900 एवढा आहे. तर काल हाच भाव 46 हजार 200 एवढा होता. पुण्यातच 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रती 10 ग्राम आज 46 हजार 900 रुपये एवढा आहे तर तो काल 47 हजार 200 एवढा होता.
नाशकात आहे स्थिर की कमी जास्त?
नाशकात 22 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्राम कालचा भाव होता 46 हजार 200 तर आजचा भाव आहे 45 हजार 900 म्हणजे जवळपास 300 रुपयांनी कालच्या आजच्या दरात फरक पडलाय. नाशकातच प्रती 10 ग्राम, 24 कॅरेट सोन्याचा कालचा भाव होता, 47 हजार 200 तर तो आज आहे 46 हजार 900.
विदर्भात कसाय सोन्याचा भाव?
नागपूर आहे आणखी एक महाराष्ट्राचं मेट्रो शहर. तिथं 22 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्राम कालचा भाव होता 46 हजार 200 रुपये तर आजचा भाव आहे 45 हजार 900 रुपये म्हणजेच नागपुरातही तीनशे रुपयाचा फरक पडलाय. नागपुरातच 24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रामचा कालचा भाव होता 47 हजार 200 रुपये तर आजचा भाव आहे 46 हजार 900 रुपये. म्हणजेच सोनं 22 कॅरेट असो की 24, कालच्या आजच्या दरात तीनशे रुपयांचा फरक पडलाय.
संबंधित बातम्या:
1 जुलैपासून सोनं विकायचं असल्यास ‘ही’ गोष्ट गरजेची, अन्यथा…
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही
(Gold and Silver rates in Maharashtra)