gold rate today : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज काय आहे सोन्याचा भाव, वाचा ताजे दर

बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीतील सोन्याचा वायदा भावात (Gold Price Today) 0.36 टक्की तेजी आली आहे.

gold rate today : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज काय आहे सोन्याचा भाव, वाचा ताजे दर
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 11:10 AM

Gold and Silver Rate Today : मागच्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण आज बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये (Gold/Silver Rate Today) तेजी पाहायला मिळाली आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीतील सोन्याचा वायदा भावात (Gold Price Today) 0.36 टक्की तेजी आली आहे. तर मार्चमधील चांदीचा वायदा भावात (Silve Price Today) 1.67 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. (gold and silver rates latest news 3 february 2021 gold rate today mumabi delhi)

महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे सोन्याच्या किंमती गेल्या दोन सत्रात 1,800 रुपयांनी खाली आल्या आहेत. बुधवारी मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव 174 रुपयांनी वाढून 47,925 रुपए प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर एक किलोग्रॅम चांदीची किंमत 1,125 रुपयांनी वाढून 68,666 रुपयांवर पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मतबूतीमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमती 0.4 टक्क्यांनी वाढून 1,844.48 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. तर यावेळी चांदीचा भाव 3.2 टक्क्यांनी वधारत 27.25 डॉलर प्रति औंस झाला आहे.

सराफा बाजारात भाव पडले

घरेलू सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या भावांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. राजधानी नवी दिल्लीत सोन्याचे दरात 480 रुपयांनी घट झाली होती. त्यामुळे सोन्याची किंमत प्रतितोळा 47 हजार 702 रुपये इतकी झाली होती. फक्त दिल्लीतच नाही तर अनेक ठिकाणच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या किंमतीत घट झाली होती. महत्त्वाचं म्हणजे मागील सत्रात सोन्याचे दर प्रतितोळा 48 हजार 182 रुपये इतके झाले होते.

सोन्याच्या किंमतीत घट होणार का?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. मात्र, त्यांनी सोने-चांदीवर अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावणार असल्याचंदेखील सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एकीकडे कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली तर दुसरीकडे सोन्यावर अडीच टक्क्याचा सेस लावणार असल्याचं सांगितलं.

“सोन्यावर आधी साडेबारा टक्के कस्टम ड्युटी होती. ती आता साडेसात टक्क्यांपर्यंत आणली आहे. पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. पण दुसरीकडे सरकारने अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावलेला आहे. जी पूर्वी साडेबारा टक्के ड्युटी होती ती आता साडेसात अधिक अडीच म्हणजे दहा टक्के कर हा लागणारच आहे. त्यामुळे अडीच टक्क्याचा निश्चित फायदा हा सोनारांना होईल. किंवा सोनं स्वस्त होईल. आता तो फायदा सोनार ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे”, अशी भूमिका अर्थतज्ज्ञ निखिलेश सोमण यांनी मांडली. (gold and silver rates latest news 3 february 2021 gold rate today mumabi delhi)

संबंधित बातम्या – 

Gold Silver Rate Today | दोन दिवसात सोन्याच्या किंमतीत 1500 रुपयांची घट, मुंबईसह चार शहरांचे दर काय?

बाजार भावापेक्षा 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे खास योजना

क्षणात गुंतवणुकदारांची संपत्ती 4 लाख कोटींनी वाढली, बजेटनंतर Stock Market ने मोडला रेकॉर्ड

फक्त 50 हजार लावून कमवा 2.50 लाख, आताच सुरू करा डबल फायदा असलेला ‘हा’ बिझनेस

(gold and silver rates latest news 3 february 2021 gold rate today mumabi delhi)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.