Gold Price: सोन्याचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या आजचा दर

Gold and Silver | आज सलग दिसऱ्या दिवशी MCX मध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑगस्ट वायद्याच्या सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढला.

Gold Price: सोन्याचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या आजचा दर
यामुळे दुबईतील सोने व्यापाऱ्याचा एक मोठा हिस्सा भारताकडे वळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. सध्याच्या घडीला लंडन, तुर्की आणि शांघायमध्ये अशाप्रकारचे एक्स्चेंज आहेत.
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 11:18 AM

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. अशातच बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याचा दर (Gold price) दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचला. आज सलग दिसऱ्या दिवशी MCX मध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑगस्ट वायद्याच्या सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढला. तर ऑगस्ट वायद्यासाठीच्या चांदीच्या दरात 0.42 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. (Gold and Silver rates in Commodity MCX market)

रुपयांमध्ये आकडेमोड करायची झाल्यास आज MCX वर सोन्याचा दर 65 रुपयांनी वाढून प्रतितोळा 47,076 रुपये इतका झाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 1,780.06 डॉलर्स इतकी झाली आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या भावात तेजी

गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याचा दर (Gold rates) 0.40 टक्क्यांनी वाढला होता. मात्र, चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर मंगळवारीही मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर (Gold rates) साधारण 100 रुपयांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरातही 0.12 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

देशभरात 16 जुनपासून हॉलमार्किंग अनिवार्य

देशभरात 16 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो.

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफ व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

संबंधित बातम्या:

स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…

Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

सोनं खरं की खोटं कसं ओळखाल? आता प्रत्येक दागिन्यावर ‘ही’ 4 चिन्ह पाहा, उत्तर मिळेल

(Gold and Silver rates in Commodity MCX market)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.