AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Gold : काय सांगता, सोने खरेदी करता येणार 10 रुपयांत; PhonePe चा बाजारात धमाका

Digital Gold PhonePe : फिनटेक प्लॅटफार्म फोनपेने गुंतवणूकदारांसाठी एक जबरदस्त योजना आणली आहे. ग्राहकांना नियमित बचत करण्यासाठी फोनपे प्लॅटफॉर्मवर रोज कमीत कमी 10 रुपयांची तर कमाल 5,000 रुपये डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. काय आहे ही योजना, कशी करता येईल बचत?

Digital Gold : काय सांगता, सोने खरेदी करता येणार 10 रुपयांत; PhonePe चा बाजारात धमाका
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक वाढली
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 3:26 PM

सोने दिवसागणिक नवनवीन रेकॉर्ड ब्रेक करत आहे. आताही सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. पण याचा अर्थ तुम्ही सोन्यातच गुंतवणूक करू शकत नाही असा होत नाही. UPI मधील दादा कंपनी PhonePe ने अल्प बचत प्लॅटफॉर्म Jar सोबत एक नवीन योजना बाजारात आणली आहे. कंपनीच्या या योजनेत गुंतवणूकदारांना रोज बचत करता येईल. ग्राहकाला रोज 24 कॅरेट सोन्यात ऑनलाईन गुंतवणूक करता येईल. या नवीन योजनेत ग्राहक प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 रुपये आणि कमाल 5,000 रुपये गुंतवणूक करू शकणार आहे. त्यामुळे कमी रक्कमेत एक मोठी गुंतवणूक त्याला करता येईल. थेट 24 कॅरेट सोन्यात त्याला गुंतवणूक करता येईल. बचतीची सवय त्याच्या अंगवळणी पडेल.

बचतीचा प्रभावी मंत्र

‘Daily Savings’ हे उत्पादन Jar च्या Gold Tech सॉल्यूशनच्या मदतीने ऑपरेट करता येईल. त्यामुळे गुंतवणूकदार अवघ्या 45 सेकंदात डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करु शकतील. गेल्या काही दिवसांपासून डिजिटल गोल्डची मागणी वाढल्याचे, PhonePe च्या इन-ॲप कॅटेगिरी प्रमुख निहारिका सैगल यांचे मत आहे. त्यामुळे फोनपेने छोट्या गुंतवणूकदारांना डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता यावी, यासाठी बचतीचा हा प्रभावी मंत्र दिला आहे. त्याआधारे अल्प बचत करून मोठी गुंतवणूक करता येईल.

हे सुद्धा वाचा

सोन्यातील गुंतवणूक वाढली

PhonePe च्या दाव्यानुसार, आजकाल स्वस्त आणि सुरक्षितरित्या डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रचलन वाढले आहे. त्यामुळे कंपनीने Jar च्या सोबतीने एक नवीन पाऊल टाकले आहे. Jar ची Gold Tech सुविधेच्या माध्यमातून PhonePe च्या 560 दशलक्षहून अधिक युझर्ससाठी डिजिटल गोल्डमध्ये बचत करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही गुंतवणूक सुरक्षित आणि सोपी असल्याचा कंपनीचा दावा आहे. डिजिटल गोल्डमध्ये केलेली गुंतवणूक ग्राहक गरजेनुसार, नियम आणि अटीनुसार काढू शकतो. या नवीन योजनेत ग्राहक प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 रुपये आणि कमाल 5,000 रुपये गुंतवणूक करता येणार आहे.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.