Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सोन्याचा आपटी बार! इतका कमी झाला 22 कॅरेटचा भाव

Gold Silver Price Today : सोने-चांदीने खरेदीदारांसाठी आनंदवार्ता आणली आहे. उन्हाचा पारा वाढत असला तरी खरेदीदारांना मात्र उकळ्या फुटत आहे. दोन्ही मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी आहे.

Gold Silver Price Today : सोन्याचा आपटी बार! इतका कमी झाला 22 कॅरेटचा भाव
आनंदवार्ता आली
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 10:57 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीने (Gold Silver Price) ग्राहकांसाठी स्वस्ताईचा मुहूर्त साधला. चांदी तर गेल्या आठवड्यापासूनच घसरणीवर होती. पण सोन्याच्या किंमतीत चढउतार सुरु होता. 16 मे वगळता गेल्या 14 मेपासून सोन्याला मोठी झेप घेता आली नाही. सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला. 18 मे रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली. तर चांदीत सुरु असलेली घसरण कायम आहे. उन्हाचा पारा चढता असला तरी खरेदीदारांना मात्र उकळ्या फुटत आहे. दोन्ही मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी आहे. अमेरिकन धोरणाचा हा परिणाम आहे. डॉलरचा दबाव सातत्याने वाढत असल्याने किंमतीत घसरण होत आहे. पण जागतिक महासत्तेने धोरण बदलले तर सोन्याच्या किंमती भडकू शकता.

असा बदलला भाव

  1. गुडरिटर्न्सनुसार, सोमवारी 15 मे रोजी सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही
  2. 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 56,800 रुपये होते. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,940 रुपये होता
  3. हे सुद्धा वाचा
  4. 16 मे रोजी हा भाव अनुक्रमे 56,790 रुपये आणि 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  5. 17 मे रोजी 22 कॅरेट सोन्यात 450 रुपये आणि 24 कॅरेटमध्ये 490 रुपयांची घसरण झाली
  6. भाव अनुक्रमे 56,900 रुपये आणि 62,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होते

दोन दिवसांत 600 रुपयांची घसरण 18 मे रोजी 22 कॅरेट सोन्यात 200 रुपयांची घसरण झाली. हा भाव 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्यात 220 रुपयांची घसरण होऊन भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दोन दिवसांत सोन्यात 600 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सने जाहीर केलेल्या किंमतीनुसार हे भाव आहेत.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,646 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,403 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,552 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,485 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

चांदीत इतकी मोठी घसरण ibjarates.com नुसार, 18 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 71,808 रुपये होता. 16 मे रोजी संध्याकाळी हा भाव 71,930 रुपये होता. एक किलो चांदीचा भाव 15 मे रोजी 72,455 रुपये होता. तर गुडरिटर्ननुसार, 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये होता. त्यानंतर घसरण सुरु झाली.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.