आनंदाची बातमी! सोने स्वस्त, चांदीही घसरली, पटापट तपासा ताजे दर
फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.18 टक्क्यांनी घसरून 47,785 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.05 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61, 278 रुपये आहे.
नवी दिल्ली : लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.18 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी चांदीचे भाव 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.18 टक्क्यांनी घसरून 47,785 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.05 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव (आजचा चांदीचा दर) 61, 278 रुपये आहे.
विक्रमी उच्चांकापेक्षा 8400 रुपये स्वस्त
2020 बद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,785 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8400 रुपयांनी स्वस्त होत आहे.
मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता, यासाठी तुम्हाला8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता?
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.
संबंधित बातम्या
20000 रुपयांत ‘या’ वनस्पतीची करा लागवड, 3.5 लाख सहज कमवा, कसे ते जाणून घ्या?
दर महिन्याला 25000 ची बचत अन् 3.32 कोटी मिळणार, SIP मध्ये जबरदस्त फायदा