Gold Outlook 2021 : नववर्षात सोन्याची किंमत वधारणार, प्रतितोळा 63 हजारांचा टप्पा गाठणार!

कोरोना लसीच्या बातम्यांमुळे याचे भाव उतरले आहेत, मात्र नववर्षात ते भाव पुन्हा वाढतील. (Gold Rate In 2021 Will Cross 60000)

Gold Outlook 2021 : नववर्षात सोन्याची किंमत वधारणार, प्रतितोळा 63 हजारांचा टप्पा गाठणार!
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 4:19 PM

नवी दिल्ली : गुंतवणूकीसाठी सोने-चांदी हे नेहमीच सुरक्षित समजले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जगभरातील गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक केली. त्यामुळे गेल्या ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय मार्केटमध्ये MCX वर सोन्याचा दर हा 56 हजारांच्या पार गेला आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याची किंमत ही 2089 डॉलर प्रति औंस इतकी झाली आहे. (Gold Rate In 2021 Will Cross 60000)

दरम्यान MCX वर सोन्याचा दर हा 50 हजारांच्या पार आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हा दर 1880 डॉलर इतका पोहोचला आहे. त्यामुळे येत्या 2021 मध्ये सोने-चांदीचे भाव वाढणार का? असा प्रश्न पडला आहे. सोने-चांदीच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना लसीच्या बातम्यांमुळे याचे भाव उतरले आहेत, मात्र नववर्षात ते भाव पुन्हा वाढतील.

प्रतितोळा 63 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता 

काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर कमी केला आहे. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आले. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरु झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला देशांतर्गत सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 39100 रुपये इतका होता. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हा सोन्याचा दर 1517 डॉलर प्रति औंस इतका होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोने-चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ झाली. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव हा प्रति दहा ग्रॅम 56 हजार 191 रुपये इतका झाला. म्हणजेच वर्षभरात सोन्याची किंमत 40 टक्क्यांनी वाढली. दरम्यान सध्याच्या किंमतीनुसार त्यात 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

कॉम ट्रेंड रिस्क मॅनेजमेंट सर्विसचे सीईओ Gnanasekar Thiagarajan यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरी बाजारात कोरोनाची लशीबाबत विविध बातम्या येत असल्या, तरीही सोन्याची किंमतीत त्याचा फारसा फरक पडलेला नाही. येत्या वर्षातही सोन्याची किंमत वाढेल. देशातंर्गत अर्थव्यवस्था नवनवीन आर्थिक पॅकेजचा विचार करत आहेत. त्यामुळे डॉलरच्या किंमतीत तुलनेने घट होत आहे.

येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो. (Gold Rate In 2021 Will Cross 60000)

संबंधित बातम्या : 

नव्या वर्षात सोने खरेदीचा बेत आखताय? मग ही स्वस्त मस्त योजना वाचा

Gold rate today : वीकेंडला सोने खरेदीचा विचार करताय? आजचे दर पाहा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.